मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिलांबाबत नेहमी आदरच, गुलाबराव पाटलांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी!

महिलांबाबत नेहमी आदरच, गुलाबराव पाटलांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी!

 माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 19 डिसेंबर : 'माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालिनी (Hema Malini) यांच्या गालासारखे आहे', असं विधान करणारे शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  (Minister Gulabrao Patil) यांनी अखेर माफी मागितली आहे. 'महिलांबाबत आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना आहे, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला' असं म्हणत गुलाबराव पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. विरोधकांसह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर अखेर गुलाबराव पाटील यांनी ट्वीट करून आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

'मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे तसंच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील, असंही पाटील यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते पाटील?

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं होतं.

Year Ender 2021: कोरोनाकाळात बेरोजगारीत झाली प्रचंड वाढ; धक्कादायक आकडेवारी समोर

"माझं चॅलेंज आहे 30 वर्षे आमदार राहिलेल्याला.. या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईल. अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता करा." असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे.

First published: