मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कोरोना'च्या नावानं पोल्ट्री चालकाचा असाही पब्लिसिटी स्टंट, असं उघडं पडलं पितळ!

'कोरोना'च्या नावानं पोल्ट्री चालकाचा असाही पब्लिसिटी स्टंट, असं उघडं पडलं पितळ!

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत.

    कन्हैया खंडेलवाल(प्रतिनिधी), हिंगोली, 16 मार्च:संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. यामध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण कोरोनाच्या नावाने स्वतःचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथे घडला आहे. 12 मार्च रोजी दरेगाव येथील पोल्ट्री चालकाने अनेक माध्यम प्रतिनिधींना बोलावून 21 हजार जिवंत कोंबड्या पुरल्याचा दावा केला होता. मात्र त्या पोल्ट्री चालकाचा हा पब्लिसिटी स्टंट असून शासनाकडून काही मिळते का या उद्देशानेत्याने असा प्रकार केल्याची बातमी 'न्यूज 18 लोकमत'ने प्रसिद्ध केली होती. 'न्यूज 18 लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता त्या पोल्ट्री फॉर्मवर 21 हजार नाही तर फक्त 16 हजार कोंबड्यांचे पिलं होते. त्यापैकी 8 हजार पिलं पुरले होती. त्यापैकी 4 हजार पिलं जिवंत सापडले आहेत. म्हणजेच पोल्ट्री फॉर्म चालकाचा 21 हजार कोंबड्या पुरल्याच नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या चौकशीत पितळ उघडं पडलं आहे. केवळ 4 हजार कोंबड्यांचे पिलं पुरल्याचा आता स्पष्ट झालं आहे. 'न्यूज 18 लोकमत'ने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे ठरले आहे. कोरोनाच्या नावावर हा पोल्ट्री व्यावसायिक फसवणूक करत असल्याने खऱ्या पीडितांवर कोणीच विश्वास करणार नाही. आता पोलीस संबंधित पोल्ट्री चालकावर काय कारवाई करणार, हे पाहाणे महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा.. मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या 39 वर दरम्यान,राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी आणखी चार रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता एकूण कोरोणा विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी राजेश टोपे दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता राज्यात शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हेही वाचा...'तुम्ही मरा', 'कोरोना'ने घाबरलेल्या कैद्यांनी जेलमधून पत्र केलं व्हायरल
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maharashtra news

    पुढील बातम्या