Home /News /maharashtra /

Eknath Shinde Guwahati :मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर मातोश्रीवर तर भाऊ संजय पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत, कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण

Eknath Shinde Guwahati :मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर मातोश्रीवर तर भाऊ संजय पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत, कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  मुंबई, 22 जून : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा (shivsena) फोटो समोर आल्यानंतर बरेच चेहरे समोर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत 30 पेक्षा जास्त आमदार असल्याची बातमी समोर येत होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत नेमके कोणकोणते आमदार आहेत याची थेट माहिती देणारा फोटोच आता समोर आला आहे. हा फोटो 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे मंत्री बच्चू कडू, (minister bacchu kadu) याचबरोबर मंत्री शंभुराज देसाई (minister shambhuraj desai) यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचे आमदार मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Kolhapur shirol mla rajendra patil yadravkar) यांचे बंधू देखील या आमदारांसोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  समोर आलेल्या फोटोनुसार, एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू, राजकुमार पटेल, यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे मातोश्रीसोबत असल्याचे बोलले जात आहे. 

  हे ही वाचा : Eknath Shinde : ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदे मोठी खेळी करणार, मुंबईत येणार?

  याचबरोबर जिकडे मंत्रीपद तिकडे आम्ही अशीही चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू आहे. दरम्यान राधानगरीचे आमदार प्रकाश अबिटकर हे शिवसेनेतून दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळे वरीष्ठ म्हणून त्यांना शिवसेनेकडून अबिटकरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. परंतु यड्रावकर हे अजित पवार आणि जयंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. यावेळी अबिटकर नाराज झाल्याचेही बोलले जात होते. 

  हे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार

  त्यापाठोपाठ आमदार महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभुराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहार कांदे, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजयकुमार रायमुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे, विश्ननाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वणगा, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनवणे, यामिनी जाधव आणि बालाजी किणीकर यांचा शिंदेंना पाठिंबा आहे. या आमदारांच्या साथीने शिंदे भाजपसोबत हातमिळवणी करु शकतात किंवा स्वतंत्र पक्षाची देखील स्थापना करु शकतात.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Kolhapur, Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या