युती होईल असं वाटत नाही, निर्णय योग्य वेळी जाहीर करू - संजय राऊत

युती होईल असं वाटत नाही, निर्णय योग्य वेळी जाहीर करू - संजय राऊत

'योग्य व्यासपीठावर आणि योग्य वेळी आम्ही युतीची भूमिका जाहीर करू. फक्त राजकीय फायद्यासाठी शिवसेना लाचार होणार नाही.'

  • Share this:

मुंबई 7 जानेवारी : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रविवारच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेतला तणाव वाढला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी 'न्यूज18 लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. त्यातल्या वक्तव्यामुळे त्या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने गोरेगावच्या मेळाव्यात आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत जी घोषणा केली त्यापासून आम्ही दूर जाणार नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं. या दोनही ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे युती करणार नाही, शिवसेना स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेना युतीच्या मानसिकतेत नाही असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

राऊत म्हणाले, " आम्ही स्वबळाची घोषणा दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यापासून आम्ही मागे हटलो नाही आणि या पुढेही मागे हटू असं वाटत नाही. योग्य व्यासपीठावर आणि योग्य वेळी आम्ही युतीची भूमिका जाहीर करू." फक्त राजकीय फायद्यासाठी शिवसेना लाचार होणार नाही असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते अमित शहा?

राज्यात युती झाली तर ठिक, नाही तर विरोधियोंको 'पटक' देंगे  असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी लातूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला होता. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

शिवसेनेची प्रतिक्रिया

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यानी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फीर सरकार असा नारा दिला.

तो झोंबल्या मुळेच आणि शिवसेनेच्या आसुड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या , एकंदर चांगलेच झाले , भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे.

5 राज्यांच्या निकलानंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच , भारतीय जनतेने त्याना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहेच , लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली इ व्ही एम् शी युती होणार हे जहीर केलेच आहे , तसेही त्यांच्या अनील गोटे नावाच्या आमदाराने धुळे महानगर पालिकेत यांचे भांडे फोडलेच आहे .

आता होऊंन जाऊद्या , शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच , येऊ दया अंगावर , होऊ दया सामना , हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही "

VIDEO : कोण अमित शहा? सेना मंत्र्याचा सवाल

First published: January 7, 2019, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading