• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • '15 दिवसात आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देतो अन्यथा तुम्ही पदाचा राजीनामा द्या' रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना आव्हान

'15 दिवसात आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देतो अन्यथा तुम्ही पदाचा राजीनामा द्या' रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना आव्हान

"15 दिवसात आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो अन्यथा तुम्ही राजीनामा द्या" रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना चॅलेंज

"15 दिवसात आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो अन्यथा तुम्ही राजीनामा द्या" रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना चॅलेंज

Ravi Rana open challenge to Yashimati Thakur: आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना खुले आव्हान दिले आहे.

  • Share this:
अमरावती, 19 ऑक्टोबर : शेतकऱ्यांना आर्तिक मदत दिवाळीपूर्वी देण्याच्या मागणीवरुन आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यानंतर मेळघाटातील आदिवासींची जमीन आमदार रवी राणा यांनी हडपली असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना ओपन चॅलेंज दिले आहे. जमीन हडपली असल्याचा आरोप करणाऱ्या यशोमती ठाकूर यांना आमदार रवी राणा यांनी खुले आव्हान दिले आहे. आक्रमक झालेल्या आमदार रवी राणा यांनी म्हटलं, माझ्यावरील आरोप 15 दिवसात सिद्ध करा आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो तर आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा ठराव जिल्हा नियोजन बैठकीमध्ये घेऊ असं आश्वासन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिलं होत. मात्र तो ठराव घेतला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास यशोमती ठाकूर यांचा ताफा अडवून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेईल असे देखील रवी राणा यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीपूर्वी आमदार रवी राणा यांनी आपल्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्ह्याधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवना समोर खराब झालेलं सोयाबीन जाळून टाकत शेतमाल फेकला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर रवी राणा हे जिल्हा नियोजन बैठकीत शिरले यावेळी रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यात एकमेकांना हातवारे करून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये खंडाजंगी झाली दरम्यान यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकेचे झोड उठवली. वाचा : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाचा होतोय दुरुपयोग, यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप रवी राणा हे शेतकऱ्यांचे कैवारी स्वतः ला दाखवून नौटंकी करीत असल्याची टीका केली. तर एका शाळेची जमीन तसेच मेळघाटातील आदिवासींची जमीन राणा यांनी हडपली असल्याचा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर केला. त्यामुळे आता राणा व ठाकूर यांचा वाद अमरावतीत चांगलाच पेटला आहे. 'मी आमदार आहे बोलतोय ना', भर बैठकीत रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत टाकावी या मागणीसाठी ठराव करावा अशी आग्रही मागणी केली. यावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हळू बोलण्याची सूचना रवी राणांना केली. पण, रवी राणा यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. मी आमदार आहे, मी बोलतोय इथं असं म्हणत रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीआधी काही मदत मिळणार की नाही, असा थेट सवाल केला. रवी राणा ऐकून घेण्यास तयार नसल्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. हळू आवाजात बोला असं सांगितलं, बोट दाखवून बोलू नका मी म्हणते. असं म्हणत त्यांनी पोलीस आयुक्तांना बोलवावे असे फर्मान सोडले. रवी राणा केवळ नौटकी करत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यामुळे लगेच रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडले.
Published by:Sunil Desale
First published: