EXCLUSIVE : कोरोनाला औषध नाही, मग 14 दिवस रुग्णावर काय उपचार केले जातात?

EXCLUSIVE : कोरोनाला औषध नाही, मग 14 दिवस रुग्णावर काय उपचार केले जातात?

कोरोना संशयित रुग्णांना विशेष कक्षात ठेवलं जातं; पण त्यांच्यावर काय उपचार केले जातात? औरंगाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 13 मार्च - कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. पुणे, मुंबई, ठाण्यानंतर नागपुरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे. याशिवाय मराठवाड्यातही कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांचं 14 दिवस विलगीकरण (Quarantine ) करून उपचार केले जातात. पण एकीकडे कोरोनाव्हायरसवर औषध सापडलं नसल्याचं स्पष्ट असताना, या रुग्णांवर नेमके कोणते औषधोपचार केले जातात? औरंगाबादच्या  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती News18 Lokmat ला दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 19 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. 17 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कुलकर्णी यांनी दिली. लक्षणं दिसेपर्यंत किंवा कोरोना तपासणीचे रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांवर कुठले उपचार केले जातात असं विचारल्यावर डॉ. कुलकर्णी म्हणाले,  ‘एखादा संशयित रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल केला जातो त्यावेळी लगेच त्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसणं सुरू होत नाही. त्यामुळे लक्षणं दिसतील त्यानुसारच उपचार केले जातात.'

14 दिवसात काय केलं जातं?

डॉ. कुलकर्णी म्हणाले,  'रुग्णाला असलेली कोरोनाची लक्षणे समजण्यासाठी काही काळा जाऊ द्यावा लागतो. प्रत्येकाच्या इम्युनिटीनुसार संबंधित रुग्णावर उपचार केले जातात. ही साधारण लक्षणं दिसण्याचा कालावधी 9 ते 11 दिवसांचा आहे. पण सुरक्षेचा विषय लक्षात घेता रुग्णाला 14 दिवस देखरेखीखाली ठेवलं जातं.

वाचा - जगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! कोरोनाचे 10 रुग्ण झाले ठणठणीत

या 14 दिवसात रुग्णावर कोरोनाची लक्षणं दिसतात का हे पाहिले जाते. जर 14 दिवस लक्षणे आलीच नाहीत तर खूप चांगलं. म्हणजे कुठलाही धोका नाही. याउलट जर सतत ताप येणं, सर्दी, खोकला अशी लक्षणं दिसून आली तर त्यानंतर संबंधित रुग्णावर पुढचे उपचार केले जातात.’

संशयितांबाबतही डॉक्टर सतर्क 

 जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काय या 14 दिवसांच्या उपचार पद्धतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘ज्या संशयित रुग्णांना लक्षणं न दिसल्याने घरी सोडण्यात आलंय, त्यांच्याशीही आमची टीम रोज मोबाईलवर संपर्कात असते. संशयित रुग्णांशी संवाद साधत असते. या संभाषणात जर रुग्णाला खरंच अधिक तपासण्याची गरज असेल तर त्यावर पुढील निर्णय घ्यावे लागतात.  त्यानंतर  त्या संबंधित रुग्णाला रुग्णालयात तपासणीसाठी बोलवून त्यानुसार डॉक्टर्सची टीम पुढची पाऊलं उचलतात.’

नेमके रुग्णावर कसे उपचार होतात?

रुग्णावर कसे उपचार केले जातात याबाबातही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी न्यूज18 लोकमतशी बोलतांना सांगितलं आहे. ‘कोरोनासाठी सध्यातरी कुठलं औषध दिलं जावं याबबात WHO कडून काही गाईडलाइन्स आलेल्या नाहीत. पण तोपर्यंत रुग्णांच्या लक्षणावर आधारित उपचार करावा लागतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत तोपर्यंत त्या रुग्णावर काहीच उपचार करण्याची गरज नाही.

वाचा - ‘कोरोना’ची माहिती घेण्यासाठी Link ओपन करताना सावधान, रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट

संशयित रुग्णाला ताप, सर्दी, खोकला या आधारे गोळ्या दिल्या जातात. पण संशयित रुग्ण जर पॉझिटिव्ह आढळला तर त्याला अधिक तीव्र औषधोपचार दिले जातील, गरज पडल्यास रुग्णाला व्हेंटिलेटवरही ठेवलं जाईल,’ असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

डॉक्टरांना संसर्गाची भीती नाही का?

डॉक्टर सतत विविध कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात असतात. पण यावेळी डॉक्टरांना काही भीती वाटत नाही का, असा सर्वांनाच प्रश्न पडतो. याबाबतही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, ‘डॉक्टर पुरेशी काळजी घेऊनच रुग्णाशी संवाद साधतात. पण बऱ्याचदा रुग्णांना मानसिक आधार द्यायची गरज असते.' एका रुग्णाच्या तपासणीचा अनुभव डॉक्टरांनी सांगितला.  "ज्यावेळी रुग्ण तपासणीसाठी आला होता तेव्हा तो मास्क घालून आलेला होता. यानंतर डॉक्टरांनी त्याला मास्क काढायला  सांगितलं. अगदी व्यवस्थित त्याच्याशी मास्करहीत संभाषण झाले. सुरुवातीला रुग्ण बराच घाबरलेला होता. पण त्याला धीर देत मास्क काढून त्याच्याशी तासभर संवाद साधला. आणि त्यानंतर त्याला फार बरं वाटलं. म्हणजेच यासाठी मानसिक आधार देणं जास्त गरजेचं आहे."

कोरोनासंदर्भात अनावश्यक पॅनिक टाळणं आवश्यक आहे. हा आजार बरा होऊ शकतो. फक्त योग्य ती काळजी घेणं आणि आजार पसरू न देणं हे महत्त्वाचं आहे.

अन्य बातम्या

'चला हवा येऊ द्या' वादात, संभाजीराजेंनी निलेश साबळे आणि 'झी मराठी'ला दिला इशारा

कोरोनाचा जगभर धुमाकूळ, नगर जिल्ह्याला 600 कोटींचा फटका

First published: March 13, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading