मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फील्डिंग

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फील्डिंग

एकनाथ शिंदें राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी करणार महत्त्वाचं काम

एकनाथ शिंदें राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी करणार महत्त्वाचं काम

एकनाथ शिंदें राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी करणार महत्त्वाचं काम

    मुंबई, 8 ऑगस्ट : शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण अखेर आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांना शपथ दिली जाणार  आहे. भाजप आणि शिंदे गटातून काही नावं ही निश्चित झाली आहे. ज्यांना निरोप भेटला ते नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्यमंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदारांना उद्या सकाळी सह्याद्री अथितिगृहात बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यासाठी सर्व आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री अथितिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीतच मंत्रिमंडळात कुणाची सहभाग होणार हे अधिकृत जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडून कोण कॅबिनेट मंत्री होणार आणि कोण राज्यमंत्री होणार हे उद्या होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या