'या' उपक्रमामुळे 11 वाजताच्या शाळेला विद्यार्थी 10 वाजताच शाळेत पोहोचतात!

'या' उपक्रमामुळे 11 वाजताच्या शाळेला विद्यार्थी 10 वाजताच शाळेत पोहोचतात!

कोल्हापूर शहरातल्या कदमवाडी परिसरात ही शाळा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर असं शाळेचं नाव आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 13 जुलै : प्राथमिक शाळा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या नाना तऱ्हा पाहायला मिळतात. तुमचं-आमचं बालपणही अशाच प्राथमिक शाळांमधूनच गेलं आणि त्यातच शाळेत उशिरा जाणं म्हणजे तर अनेकांचा नित्यक्रमच. पण कोल्हापूरमधल्या एका शाळेने वेगळाच उपक्रम राबवला आहे आणि इथले विद्यार्थी "वेळेत शाळेला चाललो आम्ही" अस म्हणताहेत.

कोल्हापूर शहरातल्या कदमवाडी परिसरात ही शाळा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर असं शाळेचं नाव आहे. या शाळेचा परिसर तसा झोपडपट्टी वजा वसाहतीचा. त्यामुळेच आई-वडील कामावर गेल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत उशिरा यायचे. पण त्यांना शाळेत वेळेत आणण्यासाठी शाळा प्रशासनाने एक भन्नाट उपक्रम राबवला आहे.

1972 साली स्थापना झालेल्या या शाळेत आज जवळपास शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ही शाळा जर पाहिली तर इथल्या भिंती असतील, वर्ग खोल्या असतील वेगवेगळ्या संदेशांनी सजवण्यात आल्या आहेत. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपाय म्हणून या शाळेमध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. त्यानुसार वेळेबाबतची शिस्त विद्यार्थ्यांना घालून देण्यात आली.

मग काय, इथल्या विद्यार्थ्यांनी घोषणा दिली की 'वेळेत शाळेला चाललो आम्ही.' मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी आता आपापली वेळापत्रकंच तयार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अकरा वाजता जरी शाळा भरत असली तरी अनेक विद्यार्थी दहा, साडेदहा वाजताच शाळेमध्ये दाखल होतात. त्यामुळे पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

मुलांना वेळेचं महत्त्वा पटवण्यासाठी प्रत्येक शाळेने असे उपक्रम राबवले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचं महत्त्व समजलं पाहिजे. त्यांना वेळचं महत्त्व समजलं पाहिजे. त्यामुळे असे उपक्रम प्रत्येक शाळेन राबवले पाहिजेत अशी प्रतिक्रिया शाळेच्या शिक्षिका प्रतिभा चौगुले यांनी व्यक्त केली आहे.

आजही अनेक शाळांमध्ये उशिरा आलेल्या मुलांना दंड किंवा शिक्षा दिली जाते. मात्र, मूल्यवर्धन प्रशिक्षणांतर्गत त्या विद्यार्थ्यांना जर वेळेचे महत्त्व समजावून दिलं तर नक्कीच सगळे विद्यार्थी वेळेत शाळेत येतील यात शंका नाही.

VIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 13, 2019, 2:03 PM IST

ताज्या बातम्या