नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, सर्वच नगरसेवक घेणार हातात 'कमळ'

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, सर्वच नगरसेवक घेणार हातात 'कमळ'

नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गढ समजला जातो आणि तिथेच मोठं खिंडार पडल्याने पक्षाला हा मोठा हादरा मानला जातोय.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई 29 जुलै : नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये जाणार हे आता निश्चित मानलं जातंय. त्यामुळे शहरातल्या राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीचे सर्व 57 नगरसेवकांनी हातावरचं घड्याळ सोडून हातात 'कमळ' घेण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलंय. नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गढ समजला जातो आणि तिथेच मोठं खिंडार पडल्याने पक्षाला हा मोठा हादरा मानला जातोय.

अमित शहांच्या रथातूनच निघणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, असा आहे रथ!

महापौर बंगल्यावर सर्व नगरसेवकांची बैठक झाली. यात सर्वच्या सर्व 57 नगरसेवक सहभागी झाले होते. हा निर्णय गणेश नाईकांना सांगणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जयवंत सुतार यांनी दिलीय. राष्ट्रवादीला राज्यभरातच गळती लागली असून जिल्हापातळीपासून ते आमदारांपर्यंत अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

VIDEO: गडचिरोलीत पावसानं धरला जोर; 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला

लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत असल्याने हे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेली पाच वर्ष सत्तेशीवाय काढावी लागल्याने त्याचे काय तोटे असतात हे सर्वांनी पाहिलं आहे. दिर्घकाळ सत्तेत राहिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायम सत्तेत राहण्याची सवय लागली होती. आता परिस्थिती बदलल्याने आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नांदेडमध्येही गळती

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याच नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोरठेकर यांनी सोमवारी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात समर्थकांनी भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांना आग्रह केलाय. तसेच गोरठेकर यांनी विधानसभेसाठी भोकरमधून निवडणूक लढवावी, असाही कार्यकर्त्यांनी आग्रह केलाय. विशेष म्हणजे भोकर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भोकरमध्ये गोरठेकर यांनी लढावे यासाठी समर्थकांनी आग्रह धरलाय.

संतापजनक!PUBG खेळण्यास केला मज्जाव,अर्धनग्न होईपर्यंत महिलेला अमानुष मारहाण

या घडामोडीमुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. गोरठेकर यांच्यासोबत अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी सोडणार आहेत, त्यामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 29, 2019, 4:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading