शेतकऱ्यांच्या या आहेत 8 प्रमुख मागण्या !

शेतकऱ्यांच्या या आहेत 8 प्रमुख मागण्या !

वडिलोपार्जित कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलीये.

  • Share this:

12 मार्च : नाशिकहुन 180 किमी अंतर पार करून शेतकऱ्यांचा अखिल किसान महामोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकलाय. आज हा मोर्चा विधानभवनाला घेराव घालणार आहे. शेतकऱ्यांनी हा मोर्चा ज्यासाठी काढल्या त्यासाठी आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान सुरू केली. सरकारने सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत राज्यातील अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीये. मात्र,  शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच किसान महामोर्चाने विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी केलीये. तसंच वडिलोपार्जित कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलीये.

शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य नाही झाल्यात मुंबई सोडणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय.

प्रमुख मागण्या

- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा

-  विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या

- शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

- वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

- बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई द्या

- वीजबिल माफ करा

- दुधाला किमान 40 रु. लीटर भाव हवा

First published: March 12, 2018, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading