आज 'राजकीय' शुक्रवार, राज्याचे दिग्गज नेते दौऱ्यावर

आज 'राजकीय' शुक्रवार, राज्याचे दिग्गज नेते दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख आज कोल्हापुरात आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ता व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पुण्यात आहेत.

  • Share this:

24 नोव्हेंबर : आज राजकीय शुक्रवार म्हणायला हवा.राज्यातील दिग्गज नेते आज राज्यातील विविध शहरात दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख आज कोल्हापुरात आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ता व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पुण्यात आहेत.

राज्याच्या राजकारणातले दोन दिग्गज नेते आजपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचा दोन दिवसांचा हा कोल्हापूर दौरा असणार आहे.  सरकारमध्ये एकत्र असलेल्या या दोन्ही नेत्यांनी अनेक वेळा यापूर्वी एकमेकांवर टीका केली आहे, त्यामुळे पक्षीय पातळीवर दोन्ही बाजूंनी या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

आज सकाळी उद्धव ठाकरे हे बेळगावमध्ये विमानाने दाखल होणार असून त्यानंतर चंदगड, नेसरी , करवीर या भागांमध्ये त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तर आजच दुपारी तीनच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर वारणानगरमध्ये नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम ठेवण्यात आलाय.

या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून दौऱ्याच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पण हे दोन्ही नेते एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोप करणार का याकडं  पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचं लक्ष असणार आहे.

तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. फेरीवाला आंदोलनादरम्यान दरोड्याचे गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आज राज ठाकरे भेटणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे डीएसकेंसारख्या मराठी व्यावसायिकाला मदत करण्यासाठी ठेवीदारांसोबत बैठकही राज ठाकरे करणार आहेत.

कुठले नेते कुठे आहेत?

देवेंद्र फडणवीस - कोल्हापूर

उद्धव ठाकरे - कोल्हापूर

राज ठाकरे - पुणे

नितीन गडकरी - पुणे

शरद पवार - पुणे

First published: November 24, 2017, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading