कार्लेखिंडीत शिवशाही बस आणि एसटीचा अपघात, चालकासह 25 प्रवासी जखमी

कार्लेखिंडीत शिवशाही बस आणि एसटीचा अपघात, चालकासह 25 प्रवासी जखमी

अलिबाग पेण मार्गावर शिवशाही बस आणि साधी एस. टी. बस यांची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्‍या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले.

  • Share this:

अलिबाग, 28 जून : अलिबाग पेण मार्गावर शिवशाही बस आणि साधी एस. टी. बस यांची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्‍या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. यात बसचा चालक गंभीर जखमी जखमी झाला असून त्‍याला तातडीने उपचारासाठी मुंबईत हलवण्‍यात आले आहे. तर अन्‍य जखमींवर अलिबागच्‍या जिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठीची मतमोजणी सुरू

ही आहेत लेप्टोस्पायरोसिसची कारणं आणि लक्षणं !

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज

अपघातग्रस्‍त शिवशाही बस मुरुडहून पुण्‍याकडे निघाली होती. यावेळी कार्लेखिंडीत एका अवघड वळणावर मिनीडोअरला ओव्‍हरटेक करत होती. त्यावेळी ही बस समोरून येणाऱ्या पनवेल अलिबाग या साध्‍या बसवर आदळून हा अपघात झाला . अपघातामुळे अलिबाग पेण मार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्‍प आहे.

एसटी बसचा अपघात झाल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे.२१ जून रोजी ठाणे शहरतील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची धडक झाल्याने २८ प्रवासी जखमी झाले होते. तर त्याच दिवशी रात्री नवी मुंबईतील सानपाड्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना एसटीच्या शिवनेरी बसचा अपघात झाला होता. यात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

First published: June 28, 2018, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading