मान्सूनवर पुन्हा अल् निनोचं संकट, यंदा कमी पाऊस होण्याची भीती

मान्सूनवर पुन्हा अल् निनोचं संकट, यंदा कमी पाऊस होण्याची भीती

या आठवड्यापासून मान्सूनच्या प्रवासात पुन्हा अल् निनोचा अडथळा येण्याची भीती स्कायमेटनं व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जून : पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. कारण मान्सूनवर अल् निनोचं सावट असण्याची शक्यता स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या आठवड्यापासून मान्सूनच्या प्रवासात पुन्हा अल् निनोचा अडथळा येण्याची भीती स्कायमेटनं व्यक्त केली आहे. हिंदी महासागरातून भारताच्या दिशेनं येणाऱ्या मान्सून प्रवासात अल् निनोमुळं अडथळे येऊन मान्सूनचा प्रवास बाधित होऊ शकतो. त्यामुळं मान्सून जरी भारतात पोहोचला तरी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मान्सूनचं आगमन लांबलं असलं तरी आता राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असून पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात धुवांधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)जारी केलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार देशात काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी

First published: June 7, 2019, 10:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading