आज अकोले बंद! इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदाय एकवटला

आज अकोले बंद! इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदाय एकवटला

‘आम्ही इंदोरीकरांचे समर्थक...’ असे बॅनर घेतलेले लोक इंदोरीकर महाराजांना पाठिंबा देण्यासाठी या निषेध रॅलीत सहभागी झाले आहेत

  • Share this:

इंदोरी, 23 फेब्रुवारी : निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावर काही दिवसांपूर्वी त्यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही हा वाद काही शांत होताना दिसत नाही. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्रांना कोंडू, अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

या सर्व प्रकरणानंतर इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी आणि अकोलेतील वारकऱ्यांनी 'अकोले बंद'ची घोषणा केली आहे. आज इंदोरीकर महाराजांचे जन्मस्थान इंदोरी ते अकोले अशी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या बाईक रॅलीदरम्यान विविध गावांमध्ये लोकांच्या भेटी-गाठी घेण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान अनेक महिला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उभ्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या रॅलीत  इंदोरीकर महाराजांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला आहे. अकोले येथे एका निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र काहीजण हा वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी या निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदविला जाणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ‘आम्ही इंदोरीकरांचे समर्थक’ असे बॅनर घेतलेले लोक रॅलीमध्ये दिसत आहे. विविध सामाजिक संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भजन दिंडी काढून इंदोरीकर महाराजांचे समर्थन करण्यात येणार आहे. तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फासू असं विधान केलं होतं, यामुळे संतप्त वारकऱ्यांनी बंदची हाक दिली आहे.

नेमकं इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

First published: February 23, 2020, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading