अकोला, 24 ऑगस्ट : आपल्या घराची चांगल्या पद्धतीनं सजावट करावी अशी सर्वांचीच इच्छा असते. घराच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शोभिवंत वस्तू, फर्निचरची खरेदी केली जाते. फर्निचरमध्ये सागवानपासून बनवलेल्या फर्निचरला अनेकांची पसंती असते. या फर्निचरमुळे घराचं सौंदर्य वाढतंच. त्याचबरोबर या वस्तू टिकाऊ असल्यानं या वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
अकोला शहरातील जठारपेठ भागातील शैलेश पुंड यांचे वुडन आर्ट हे या प्रकारच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या दुकानात शिवाजी महाराज, गौतम बुद्धांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींचे पुतळे सागवानाच्या लाकडातून कोरीव काम करुन बनविले जातात. यामधील बैलाची जोडी ही विशेष प्रसिद्ध आहे. ही जोडी घेण्यासाठी राज्यातील अनेक भागातील ग्राहक इथं येतात किंवा ऑर्डर करतात. त्याचबरोबर सातासमुद्रापार अमेरिकेतही ही जोडी पोहचली आहे.
20 वर्षांपूर्वी सुरूवात
शैलेश पुंड यांनी 20 वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. आता त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांनी 15 ते 20 जणांना यामधून रोजगार दिला आहे. अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशन ते जठारपेठ रोडवर असलेल्या या सागवानच्या दुकानामध्ये नेहमीच आकर्षक अशा वस्तू सर्वांचं लक्ष वेधून घेतात. यामधील सागवानच्या खुर्च्या, टेबल यांना मोठी मागणी असते.
गारमेंट कंपनीमध्ये काम करणारे समीर खुरसंगे हे काही कामानिमित्त नागपूरहून अकोल्यामध्ये आले होते. त्यावेळी फिरताना त्यांची नजर या दुकानातील सागवान बैलांवर पडली. त्यांनी तातडीनं हा बैल विकत घेतला. पोळ्याचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्या दिवशी मातीच्या बैलाचा वापर न करता हा बैल ठेवणार असल्याचं समीर यांनी सांगितलं.
निसर्गरम्य वातावरणात घ्या झटका मिसळचा आस्वाद, पाहा VIDEO
अकोला शहरातील डॉक्टर अविनाश गिराम यांनी त्यांच्या पुण्यातील घरामध्येही या दुकानातील सागावानाचं फर्निचर घेतलं आहे. त्यांनी येथून भारतीय बैठकीचं डायनिंग टेबल आणि खूर्ची घेतली आहे. त्या या वस्तू पुण्याला पाठवणार आहेत. घरामध्ये फायबरपेक्षा लाकडाच्या वस्तू वापरव्या असा सल्लाही त्यांनी दिला.
अविनाश गिराम यांच्याप्रमाणेच अनेक ग्राहकांची घरातील फर्निचरसाठी या दुकानाला पसंती आहे. बहुतेक ग्राहक या दुकानात आल्यानंतर किमान एकतरी वस्तू घरी घेऊन जातात.
गुगल मॅपवरून साभार
पत्ता : पुंड वुडन आर्ट, बिर्ला रोड, अकोला
मोबाईल नंबर - 8421729384
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News