मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Akola: "एक धागा मनाचा, सन्मानाचा अन् आमच्या हक्काचा" म्हणत विधवांनी केलीयं वटपौर्णिमा पूजा

Akola: "एक धागा मनाचा, सन्मानाचा अन् आमच्या हक्काचा" म्हणत विधवांनी केलीयं वटपौर्णिमा पूजा

X
महिला

महिला

कोणत्याही महिलेला आपण विधवा व्हावे असे वाटत नसते. काळाने पतीवर घातलेला घाला केवळ त्या महिलेला विधवाच करीत नाही तर जिवंत प्रेत करुन ठेवते. समाजात विधवांचे तोंड पाहणे आजही अशुभ मानले जाते.

  अकोला, 14 जून: जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी परंपरेनुसार वटपौर्णिमा (Vatpoornima) सुवासिनी महिला साजरी करतात. पण तुम्ही विधवा (Widow) महिलांना कधी वटपौर्णिमा साजरी करताना बघितलं का? अकोला शहरात (Akola city) आज विधवा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या झाडांना फेऱ्या मारत "आम्हालाही बाकीच्या स्त्रियांसारखा मान, सन्मान मिळावा, बाकीच्या महिलांसारख स्थान मिळाव यासाठी एक धागा मानाचा, सन्मानाचा", असं म्हणत वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

  वाचा : मुंबईची प्रसिद्ध ‘राणीची बाग’ पहिलेय? इथं हत्ती, वाघच नाही तर पेंग्विन्सही पहायला मिळतात, पहा VIDEO

  कोणत्याही महिलेला आपण विधवा (Widow) व्हावे असे वाटत नसते. काळाने पतीवर घातलेला घाला केवळ त्या महिलेला विधवाच करीत नाही तर जिवंत प्रेत करुन ठेवते. समाजात विधवांचे तोंड पाहणे आजही अशुभ मानले जाते. विधवांनी साजशृंगार करणे म्हणजे वाह्यात पणाचे लक्षण समजले जाते. अशा परिस्थितीत सौभाग्यवती महिलांचा राखीव असलेला वटपौर्णिमा सण विधवांनी साजरा करणे समाजात निषिद्ध आहे. तारुण्यातील विधवा केवळ वटपौर्णिमेला जाणाऱ्या सौभाग्यवतींना बघून आपल्या डोळ्याला पाझर फोडत असते. वैधव्य ही आपसूक आणलेली बाब नसून ती एक घटना आहे त्यामुळे दिवंगत पतीचे स्मरण करताना विधवांनी वटपौर्णिमा साजरी करायला काय हरकत आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अकोल्यातील स्वामिनी विधवा विकास मंडळ विधवा वटपौर्णिमा साजरी करत आहे. समाजातील अनिष्ट परंपरेविरुद्ध असलेली लढाई स्वामिनी संघटनेना सामाजाचा तिरस्कार झेलूनही लढत आहे.

  समाजाती अनिष्ठ रुढी परंपरांना झुगारत स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या महिलांनी आज वट पौर्णिमा साजरी करुन पुजन केले. प्रथमतः घरातून आणि समाजातून विधवांना अनेक बंधनांना आजही सामोरे जावे लागते. विधवाचे वटपौर्णिमा पूजन समाज अमान्य असल्याने विधवा महिला वट पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीतही वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरीत स्वामिनी विधवा विकास मंडळाकडून प्रवाहाविरुद्ध लढा देत आज विधवांनी वट पौर्णिमेचे पूजन केले.

  "वटपौर्णिमा असो की संक्रांत प्रत्येक सण साजरा करणार"

  समाजातून प्रतिसाद नसताना वटपौर्णिमा आम्ही साजरी केली. त्यामागचं कारण असं की, विधवा झालेल्या महिलेकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्या अशुभ असल्याचं मानलं जात, त्यांना कोणत्याही पूजेचा मान मिळत नाही. आता सर्व स्त्रियांनी बदल घडून आनायलाच हवा. वटपौर्णिमा असो की संक्रांत किंवा दिवाळीची पूजा असा प्रत्येक सण साजरा करणार आहोत. आज सुवासिनी महिलांनी सुद्धा आम्हाला हळदीकुंकू लावून आमची ओटी भरुन आम्हाला मान दिला खूप छान वाटलं. मात्र, अजूनही काही स्त्रियांना समाजातून प्रतिसाद दिला जात नाही. त्या स्त्रिया अजूनही बाहेर पडू शकतं नाहीत, त्याची आम्हाला खंत वाटते, असे पूजेसाठी आलेल्या महिलांनी सांगितले. चौकटबद्ध समाजातून प्रतिसाद नसतांना सुद्धा अनिष्ठ सामाजिक बंधनांना झुगारुन स्वामिनी संघटना करीत असलेल्या समाज सुधारणेबाबत उपस्थित विधवा महिलांनी भरभरुन कौतुक केले.

  First published:

  Tags: Akola News, Women