Home /News /maharashtra /

Akola : सरकारी दुर्लक्षामुळे देवस्थानचे हाल, प्रसिद्ध महादेव मंदिराला पाण्याचा वेढा! पाहा VIDEO

Akola : सरकारी दुर्लक्षामुळे देवस्थानचे हाल, प्रसिद्ध महादेव मंदिराला पाण्याचा वेढा! पाहा VIDEO

ड्रोन

ड्रोन सौजन्य विठ्ठल नायसे

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील पानकास नदीवरील धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे अकोला ते निंबा फाटा दरम्यान असलेल्या अंत्री मलकापूर येथील महादेव मंदिराला (Mahadev Temple) पाण्याने वेढा घातला आहे. भक्तांना आता या पावसामुळे दर्शनासाठी जाता येत नाहीये.

पुढे वाचा ...
    अकोला, 14 जुलै : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे. नद्या-नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील पानकास नदीवरील धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे अकोला ते निंबा फाटा दरम्यान असलेल्या अंत्री मलकापूर येथील महादेव मंदिराला (Mahadev Temple) पाण्याने वेढा घातला आहे. भक्तांना आता या पावसामुळे दर्शनासाठी जाता येत नाहीये. भाविकांना बाहेरूनच दर्शन कराव लागतं आहे. पाण्याने वेढलेल्या (Water encirclement), मंदिराचे दृश्य ड्रोनच्या (Drone Video) नजरेतून विठ्ठल नायसे यांनी कैद केली आहेत.  बाळापूर तालुक्यातल्या अंत्री मलकापूर येथील महादेव संस्थान आहे. तालुक्यातील हे मोठे श्रद्धास्थान आहे. मात्र सध्या मंदिराला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. आम्ही मंदिरात गेलो असता तेथील ते मंदिर संपूर्ण पाण्याने वेढलेले असून आज तिथे कुठलाही भक्त दर्शन घेऊ शकत नाहीत. मंदिर परिसरात पाणी येऊ नये यासाठी मंदिर संस्थेने शासनाकडे संरक्षण भिंतीची मागणी केली होती. मात्र, त्याची पूर्तता न  केल्यामुळे आज मंदिर संपूर्ण पाण्याने वेढलेले आहे.  शासनाने लक्ष घालून संरक्षण भिंतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी येथील नागरिक सुनीता ताथोड यांनी केली आहे. Swayambhu Mahadev Temple Antri गुगल मॅपवरून साभार वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO अंत्री मलकापूर गावाच्या बाजूला महादेव एक मंदिर आहे. पानकास नदीच्या बॅकवॉटर पाणी मंदिराच्या परिसरात घुसले आहे. पाण्याने मंदिराला वेढा घातला आहे. पाणी अधिक असल्याने सध्या तरी भाविकांनी तिथे दर्शनासाठी जाऊ नये. पाऊस कमी झाला की परिसरातील पाणी कमी होईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले आहे.
    First published:

    Tags: Akola, Akola News, Rain flood, Temple

    पुढील बातम्या