Akola : उरळ ग्रामपंचायतीचे 22 लाख विजबिल थकले, काबाडकष्ट करून पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती, पाहा VIDEO
Akola : उरळ ग्रामपंचायतीचे 22 लाख विजबिल थकले, काबाडकष्ट करून पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती, पाहा VIDEO
उरळ गावातील नागरिक शेती आणि मजुरीवर अवलंबून आहेत. दिवसभर राबराब राबून पोटाची खिळगी भरण्याचे काम नागरिक करतात. मात्र, दिवसभर काबाडकष्ट करुन पाण्यासाठी देखील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. महिलांना घर काम, शेतीकाम, मजुरी करुन पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे.
अकोला, 7 जुलै : जिल्ह्यातील उरळ गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत गेल्या महिन्यापासून नळाला येणारे पाणी बंद आहे. महावितरणने पाणीपूरवठ्याचे वीज कनेक्शन कट केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना आजूबाजूच्या शेतात, किंवा हातपंपावर पाणी भरावे लागत आहे. हातपंप परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने येथील पाण्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
उरळ गावातील नागरिक शेती आणि मजुरीवर अवलंबून आहेत. दिवसभर राबराब राबून पोटाची खिळगी भरण्याचे काम नागरिक करतात. मात्र, दिवसभर काबाडकष्ट करुन पाण्यासाठी देखील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. महिलांना घर काम, शेतीकाम, मजुरी करुन पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे. गावात हातपंप आहे. मात्र, तिथे मोठ्या प्रमाणात घानीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. येथील परिसरातील स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.
वाचा-Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEOगावातील आठपैकी चार हातपंप बंदसध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तरीही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने गावतील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. गावात एकूण आठ हँडपंप असून त्यातील चार हँडपंप हे बंद आहेत. तर चार हॅन्डपंपवर गावकरी गर्दी करुन पाणी भरतात.“पाण्यासाठी भटकंती करावी लागते.”दिवसभर शेतीचं काम करायचं आणि पाण्यासाठी भटकंती करायची. यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच हातपंप परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आहे. ग्रामपंचाय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील साफसफाई करावी आणि नळाला देखील पाणी सोडावे, अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO“22 लाख वीज बिल थकीत”गावात नळ योजना आहे. पण नागरिकांनी पाणीपट्टी कर न भरल्यामुळे महावितरणने वीज कापली आहे. 22 लाख वीज बिल थकीत आहे. जोपर्यंत थकीत रक्कम भरली जात नाही तोपर्यंत महावितरण वीज सुरू करणार नाही. ग्रामस्थांनी लवकरात लवकर थकीत कर भरणा भरावा जेणेकरून पाण्याची सोय होईल. वारी डॅम येथून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गावाकडे आलेली आहे. याचे देखील गावकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती सरपंच मंचितराव पोहरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.