मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Seed Festival starts in Akola : अकोल्यात बियाणे विक्री महोत्सवास सुरुवात; तब्बल ८२६ शेतकऱ्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

Seed Festival starts in Akola : अकोल्यात बियाणे विक्री महोत्सवास सुरुवात; तब्बल ८२६ शेतकऱ्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

या महोत्सवात चक्क बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही... 

या महोत्सवात चक्क बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही... 

अकोल्यातील बियाणे (Seed Festival) महोत्सवात ८२६ शेतकऱ्यांनी नोंद झाली आहे. तर २२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नोंद करण्यात आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी २४८ स्टॉल्स उपलब्ध आहे. तसेच महोत्सवात सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कांदा, भाजीपाला पिके आणि इतर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पुढे वाचा ...

    अकोला, 2 जून : राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवला (Seed Festival) प्रारंभ झाला आहे. अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांतील बाजार समितीत या महोत्सवला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत, तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावलेली आहे. (Seed Festival starts in Akola)

    वाचा : MH Board 10th and 12th Result : पुढील आठवड्यात बारावीचा निकाल; दहावीचा रिझल्ट कधी लागणार?

    शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला. तर अन्य तालुक्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन सोहळा पार पडला.

    या महोत्सवात दाखविले बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही

    या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी ८२६ शेतकऱ्यांनी नोंद झाली आहे. तर २२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नोंद करण्यात आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी २४८ स्टॉल्स उपलब्ध आहे. या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग, कांदा, भाजीपाला पिके आणि इतर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

    आता पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. मान्सुनही बऱ्यापैकी जवळ आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवात आपल्या जवळील बियाणे विक्री करत आहेत. ज्यांना आवश्यकता आहे ते खरेदीही करत असल्याचे दिसत आहे. या महोत्सवात बियाणे प्रक्रिया करणे, त्यात रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिकेही देण्यात येत आहे. विक्रीचे बियाणेही उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही विक्रीच्या ठिकाणी देण्यात येत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture