अकोला, 7 जून : कोरोनाच्या सावटामुळे (Corona Pandemic) शाळांचा घंटा आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत नव्हता. त्यात अधून मधून कोरोना डोकंदेखील वर काढत होता. पण, आता संपूर्ण लसीकरणामुळे राज्याच्या विविध शाळा सुरू झाल्या आहेत. अकोल्यातही काही शाळा सुरू झाल्या आहेत. बच्चे कंपनीही खूप दिवसांनी शाळेत जायला मिळाल्यामुळे खूश आहेत. नवं दप्तर, नवीन कपडे, नवी पुस्तके आणि वह्या, अशा सगळ्या शालेय वातावरणात मुले शाळेत जाताना दिसत आहे. (School starts in Akola)
जिल्ह्यातील सर्वच शाळा या 15 जूनला सुरू होणार आहेत. मात्र, अकोल्यातील म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल ही आजपासून सूरू करण्यात आली आहे. मुलांनी आज पहिल्याच दिवशी शाळेला चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. शाळा लवकर सूरू करण्यामागचा हेतू म्हणजे, मुलांच्या अभ्यासाची रिव्हिजन घेणे, त्यांना शाळेत कसं रुजवता येईल, त्यांना शिक्षणाबद्दल कशी आवड निर्माण होईल, या गोष्टींची सवय लागावी म्हणून शाळा लवकर सुरू करण्यात आली आहे, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
वाचा : चित्रपटांचे कोट्यवधी रुपयांचे बजेट कसे तयार होते? सर्वात जास्त मानधन कोणाला?
शाळेच्या मुख्याध्यापिका अर्जुना कुलकर्णी सांगतात की, "कोरोनाच्या काळात मुलांचं शैक्षणिक नुकसान फार झालं आहे. या कोरोनाच्या 2 वर्षांमुळे जवळपास मुलं 4 वर्षे अभ्यासक्रमांमध्ये मागे गेली आहेत. त्यामुळे शिक्षक आणि शाळेसाठीसुद्धा हे चॅलेंज असणार आहे. पण, मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी एक छान प्लॅन केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या अभ्यासाचं रिव्हिजन आम्ही घेणार आहोत. जेणे करून ते आत्मसात करतील. त्याच उद्देशाने आम्ही शाळा लवकर सुरू केली आहे"
वाचा : अरूंधती -आशुतोषचं पहिलं रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सोबतीस हलके’ ची एक झलक खास तुमच्यासाठी
शाळेचे शिक्षक सांगतात की, "सर्वात आधी तर मुलांना जी मोबाईलची सवय लागली आहे, ती कशी कमी करता येईल याकडे आम्ही भर देणार आहोत. त्यांना ऍक्टिव्हिटीजमध्ये कसं त्यांना बिझी करता येईल, याकडे लक्ष असेल. आपण शाळेमध्येदेखील असंच वर्क देणार आहोत की, जेणेकरून ते घरी गेल्यावर त्यांना पुस्तक वाचावी लागली पाहिजे. त्यांना पुस्तकांची गरज ही पडलीचं पाहिजे. ऍक्टिव्हिटीज असतील किंवा न्यूज पेपरमधल्या काही न्यूूज असतील त्याची कात्रणं कापून कलेक्ट करणं असेल... जेणेकरू मुलं मोबाईलपासून दूर राहतील आणि सोसायटीशी कनेक्ट होतील."
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सांगतात की, "आज आमच्या शाळेचा पहिलाच दिवस आहे. आज शाळेमध्ये आमचं स्माईली आणि सिड्स देऊन छान स्वागतसुद्धा करण्यात आलं. यावर्षी आता भरपूर अभ्यास करायचा आहे मार्क्स चांगल्या आणायचे आहेत. आम्हाला भरपूर मेहनत करायची आहे. आज आम्हाला शाळेच्या पहिल्याच दिवशी सीड्स देण्यात आले. आम्ही ते सीड्स आमच्या घरी लावायचं आणि त्यांना मोठं करायचं आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.