अकोला, 5 ऑगस्ट : शहरातील डंपिंग ग्राउंड (Dumping ground) भागातील कचरा गोळा करणाऱ्या मुलांसाठी संस्कार वर्ग (Sanskar class) सुरू करण्यात आला आहे. कचरा गोळा करणारे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पुढाकार घेतला आहे. या मुलांना शिबिरामार्फत शिक्षण देण्यात येत असून त्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अकोला शहराच्या नायगाव परिसरात डम्पिंग ग्राउंड आहे. याच डम्पिंग ग्राउंड जवळ लोक वस्ती देखील आहे. येथील नागरिक शहरात कचरा गोळा करण्याचे काम करतात. यातून अधिक पैसे मिळत नसल्याने मुला बाळांना देखील कचरा गोळा करण्याचे काम नागरिक देतात. हे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात असलेल्या सभागृहात मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात. सध्या याठिकाणी जवळपास 30 ते 35 मुलं शिक्षण घेत आहेत.
हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं
मुलांची स्वप्न मोठी आहेत
शहरातील डंपिंग ग्राउंड भागातील कचरा गोळा करणारे मुलं शाळेत न जाता कचरा वेचण्यासाठी जातात. यातील काही मुलांचे शाळेत नाव आहे तर काहींचे नाही. या मुलांनाही शिक्षण मिळावे. यासाठी मुलं आणि पालकांशी संवाद साधला. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या पुढाकाराने या मुलांसाठी दर शनिवारी संस्कार क्लास सुरू केले. येथील मुलांची स्वप्न मोठी आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षणाचे धडे आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
मला शिकून डॉक्टर व्हायचंय
आम्ही आधी कचरा गोळा करण्याचे काम करायचो. आता आम्हाला इथं शिक्षण देखील मिळत आहे. आता मला शिकून डॉक्टर व्हायचंय. आई-बाबांचं नाव मोठं करायचं आहे, असे विद्यार्थी मुस्कान परवीन सांगते.
हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report
डम्पिंग ग्राउंड येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा उपक्रम आहे. मुलांना डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर आणून आयुष्य घडवायचं आहे. त्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांची स्वप्न मोठी करायचे आहेत. त्यांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. स्वप्न मोठी करण्याचा अधिकार आहे. चांगला आयुष्य जगण्याचा सुद्धा अधिकार आहे. हेच ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News