मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...त्या तीन महिलांचं प्रकरण अन अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्षाच्या खळबळजनक आरोपामुळे राष्ट्रवादीत धुसफूस

...त्या तीन महिलांचं प्रकरण अन अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्षाच्या खळबळजनक आरोपामुळे राष्ट्रवादीत धुसफूस

अकोल्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari vs Shiva Mohod) यांच्यावर कमिशनखोरीचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच केला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

अकोला, 1 सप्टेंबर : अकोल्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari vs Shiva Mohod) यांच्यावर कमिशनखोरीचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच केला. ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. शिवा मोहोड यांच्या या आरोपांना अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. आरोप करणारा किती चारित्र्यसंपन्न आणि नॉन करप्ट आहे, हेदेखील पाहावं, असं मिटकरी म्हणाले होते. मिटकरींच्या या प्रत्युत्तरानंतर शिवा मोहोड यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत.

'यांच्या पातुरच्या महिला पदाधिकाऱ्याचं प्रकरण आजही पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. त्या प्रकरणावर पडदा पडत नाही तोच यांनी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रुपये देऊन एक प्रकरण मिटवलं. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण आचरसंहिता सुरू असताना पुण्याची एक महिला पदाधिकारी अकोल्याच्या रेस्ट हाऊसवर तीन दिवस मुक्कामी कशी? ते प्रकरण काय आहे, हे आमदारांना विचारा. त्यांची प्रकरणं काढायला बसलो तर खूप आहेत,' असे खळबळजनक आरोप शिवा मोहोड यांनी केले.

माझं चारित्र्य खराब असल्याचा एक पुरावा त्यांनी द्यावा, मी भरचौकात फाशी घ्यायला तयार आहे, असं शिवा मोहोड म्हणाले. मिटकरींनी केशवनगरमध्ये 80 लाख रुपयांना भुखंड खरेदी केला, त्याचा स्त्रोत काय? त्यांनी 30 लाखांची चारचाकी कुठून घेतली? असे प्रश्नही शिवा मोहोड यांनी उपस्थित केले.

जयंत पाटलांसमोर काय झालं?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठकीतच शिवा मोहोड यांनी मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला. मिटकरींनी 2 लाख रुपये घेऊन 20 लाखांचा निधी दिला, तसंच मिटकरींनी स्वत:च्याच कुटासा गावाला 15 कोटींचा निधी दिल्याचा आरोप करण्यात आला. मिटकरींनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडूनही कामासाठी कमिशन घेतल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मिटकरी अडचणीत आले होते. या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग होत असल्याचं दिसल्यानंतर जयंत पाटलांनी हे व्हिडिओ शूटिंग थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या.

First published:
top videos