मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखावर सपासप वार करत हत्या; या कारणामुळे जीव घेतल्याचा संशय

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखावर सपासप वार करत हत्या; या कारणामुळे जीव घेतल्याचा संशय

विशालने अनेक सामाजिक उपक्रम आणि रक्तदानासारखे अनेक उपक्रम राबवले होते.

विशालने अनेक सामाजिक उपक्रम आणि रक्तदानासारखे अनेक उपक्रम राबवले होते.

विशालने अनेक सामाजिक उपक्रम आणि रक्तदानासारखे अनेक उपक्रम राबवले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India
  • Published by:  News18 Desk

अकोला, 30 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या केल्याचे गूढ अजूनही काय आहे. मात्र, असे असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखावर चाकू हल्ला झाला आहे. विशाल कपले असे या शिवसेनेचे उपशहर प्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर दोन अज्ञातांनी चाकूने हल्ला केला. यानंतर उपचारादरम्यान, एका खासगी रुग्णालयात विशालचा मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.

हे दोन्ही हल्ला करणारे मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. हल्ल्याची ही घटना अकोला शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात रविवारी सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ विशालला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, चाकू हल्ल्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा - पनवेल : पानटपरीवर धक्का लागल्याच निमित्त झालं अन् तरुणासोबत घडलं भयानक कांड

गांजा कारवाईतून हत्या झाल्याचा अंदाज

विशालने अनेक सामाजिक उपक्रम आणि रक्तदानासारखे अनेक उपक्रम राबवले होते. यासोबतच मोठी उमरी, गुडधी परिसरात सुरू असलेल्या हॉटेलवर अवैध दारू विक्री बाबतही आवाज उचलला होता. मागील काही दिवसात विशालने काही लोकांना गांजा तस्करी करताना पकडून दिले होते. आपल्यावर गांजाची कारवाई झाली आणि आपण तुरुंगात गेलो, याचा राग मनात धरत विशाल हत्या करण्यात आली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विशालच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे करीत आहे. तर या घटनेनंतर खाजगी रुग्णालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल तात्कर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या घटनेतील हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Akola, Murder