Home /News /maharashtra /

Akola : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट; वाहतूक अडथळ्यासह अपघाताची भीती, पाहा VIDEO

Akola : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट; वाहतूक अडथळ्यासह अपघाताची भीती, पाहा VIDEO

title=

अकोला महानगर पालिका होवून आज 22 वर्ष होत झाली आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर जनावरांचा झुंड बसलेला आढळत आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण तर होतोच आहे मात्र, अपघात देखील होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याकडे महानगरपालिकेच्या विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

पुढे वाचा ...
    अकोला, 13 जुलै : शहरातील बस स्टँड चौक, अशोक वाटिका रोड, सिटी कोतवाली रोड, तुकाराम चौक अशा विविध प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा (stray animals) सुळसुळाट झाला आहे. या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर आपली जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द महापालिकेने (Municipal Corporation Akola) कडक कारवाई करण्याची गरज आहे.  अकोला महानगर पालिका होऊन आज 22 वर्ष होत झाली आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर जनावरांचा झुंड बसलेला आढळत आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण तर होतोच आहे मात्र, अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महानगरपालिकेच्या विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.  अकोला महानगर पालिकेच्या परिसरात 2 कोंडवाडे आहेत. मात्र शहरातील रस्त्यांवरील मोकाट जनावरे पाहता ती फक्त नावालाच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्य रस्त्यासह  शहरातील  गल्लोगल्ली हे मोकाट जनावरे फिरत आहेत. या जनावरांमुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही नागरिक दिवसभर आपली जनावरे रस्त्यांवर सोडून देतात. जनावरांमुळे वाहतूक अडथळा होईल, अपघात होईल याची काहीही चिंता हे नागरिक करीत नाहीत. अशा मालकांविरुद्ध महापालिकेने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. …या मार्गावर मोकाट जनावरे अकोला शहरातील प्रमुख मार्ग बस स्टँड चौक, अशोक वाटीका रोड, सिटी कोतवाली, तुकाराम चौक, कौलखेड चौक, अशोक वाटीका ते सरकारी बगीचा, गांधी रोड अशा प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. याच रस्त्यावर मोकाट जनावरे अगदी रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासह अपघात देखील होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. निसरड्या रस्त्यांमुळे वाहनांचे अचानक ब्रेक लागणे अशक्य होते. अशात मोकाट जनावर कधी वाहनासमोर येईल सांगता येत नाही. मोकाट जनावरांकडे  महानगरपालिकेचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO “मोकाट जनावरे अचानक गाडीसमोर येतात” मोकाट जनावरामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसात गाडीचा ब्रेक तेवढा लागत नाही. अशावेळी मोकाट जनावरे अचानक गाडीसमोर येतात. यामुळे गाडी सरळ जाऊन जनावरांना धडकण्याची भीती आहे. महानगरपालिकेने या मोकाट जनावरांवर उपाययोजना करावी अशी मागणी महेंद्र गवई या दुचाकीधारकाने यांनी केली आहे.  वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO “मोकाट जनावरे पकडण्यासाठी आणखी यंत्रणा वाढवू”  मोकाट जनावरांसाठी महानगरपालिकेच्या हद्दीत दोन कोंडवाडे आहेत. एक जुन्या शहरात आहे तर दुसरा शिवापुरला आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी एक चारचाकी वाहन आणि त्यासह चार कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जानावरे रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी मनपा आणखी यंत्रणा वाढवून त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महानगरपालिकेचे सेवा उपआयुक्त अनिलकुमार अढागले यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Akola, Akola News

    पुढील बातम्या