मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नळ आहे पाणी नाही, वायरिंग असूनही लाईट गायब!; आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव

Video : नळ आहे पाणी नाही, वायरिंग असूनही लाईट गायब!; आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव

आरोग्य केंद्र 'असून अडचण नसून खोळंबा’ अशा स्थितीत आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. मात्र, कार्यान्वित नाही. इमारतीच्या खोल्यांना गळती लागली आहे.

अकोला : सहा हजार लोकवस्तीसाठी 70 लाख रुपये खर्च करून सांगळूद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (Primary Health Sub Center, Sanglud) उभारण्यात आले. मात्र, आरोग्य केंद्र ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा स्थितीत आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. मात्र, कार्यान्वित नाही. इमारतीच्या खोल्यांना गळती लागली आहे. रुग्णांची स्थिती बरी होण्याऐवजी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.  पाऊस आला की पाणी गळते अकोला जिल्ह्यातल्या सांगळूद येथील सहा हजार लोकवस्तीसाठी 70 लाख रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले. परंतु, आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. नळ तर आहे पण पाणी नाही, छत आहे पण पाऊस आला की पाणी गळते, सध्या पावसाळ्याचे दिवस असून छतातून पाणी गळती होऊन परिसर ओलसर होत आहे. रुग्णाला बसायला बेंच नाहीत. इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे पण त्यामध्ये वायर नाही. परिसरामध्ये सोलर पॅनल लावण्यात आलेले आहे मात्र, त्या सोलर पॅनलची दुरवस्था झालेली आहे. सुविधेचा अभाव असलेले हे आरोग्य केंद्र फक्त शोभेची वस्तू बनले आहे. त्यामुळे हे रुग्णालय नेमकं कशासाठी बांधण्यात आले, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. सुविधाबाबतच्या सूचना, तक्रारी संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनपर्यंत यावर कुठलीही उपाय योजना करण्यात आलेली नाही. रुग्ण तसेच नातेवाईकांना याचा त्रास होत असल्याचे उपकेंद्राच्या ए.एन.एम ( ANM ) मसराम यांनी सांगितले. हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO पावसात छतावरील पाण्याची टाकी खाली पडली प्राथमिक उपकेंद्रात सुविधेचा अभाव आहे. वादळी पावसात छतावरील पाण्याची टाकी खाली पडली. सोलर पॅनलचीही अवस्था बिकट असून पॅनल कधीही ढासळू शकते. त्याच्या लाईट तुटलेले आहेत. वायरची फिटिंग आहे पण त्याला कनेक्शन जोडलेले नाही, अशा अनेक असुविधा या ठिकाणी आहेत. या संदर्भातील तक्रारी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे CHO ताकवाले यांनी सांगितले. हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO तक्रार करूनही फायदा नाही नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात सुविधेचा अभाव आहे. यासंदर्भात तक्रार करूनही काहीच फायदा झाला नाही. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिक रणजीत काळे यांनी सांगितले.
First published:

Tags: Akola, Akola News, अकोला

पुढील बातम्या