मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तृतीयपंथींनी रॅम्प वॉकवर दाखवला फॅशनचा जलवा, पाहा VIDEO

तृतीयपंथींनी रॅम्प वॉकवर दाखवला फॅशनचा जलवा, पाहा VIDEO

समाजात दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीय यांचा बहुमान वाढवा. या हेतूने प्रेरित होऊन या आगळ्यावेगळ्या शोचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला, 14 सप्टेंबर : आतापर्यंत आपण अनेक फॅशन शो पाहिले असतील. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये चक्क तृतीय पंथीय (Third Gender) यांचा फॅशन आणि टॅलेंट शो मोठ्या दिमाखात पार पडला. व्यक्ती विकास संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेसीआय अकोटच्या वतीने हा कार्यक्रम आखण्यात आला होता. समाजात दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीय यांचा बहुमान वाढवा, लोकांनी त्यांना आपल्यासारखेच स्वीकारावे. या हेतूने प्रेरित होऊन या आगळ्यावेगळ्या शोचे आयोजन करण्यात आले होते.  फॅशन व टॅलेंट शो साठी विविध जिल्ह्यातून एकूण 33 तृतीयपंथी सहभागी झाले होते. तृतीयपंथी यांनी आपल्या कलांचे सादरीकरण करून अकोटकरांना मंत्र मुग्ध केले. जेसीआय ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जेसीआय सप्ताहामध्ये नवनवीन उपक्रम राबवत असते. यावर्षी तृतीयपंथीयांना मान सन्मान मिळावा, यातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून यावेळी तृतीयपंथीयांचा रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते. क्रमांक न देता मानसन्मान  रॅम्प वॉकमध्ये जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण विदर्भातून तृतीयपंथी आले होते. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणाहून तृतीयपंथी आले होते. रॅम्प वॉकमध्ये केलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. सहभागी स्पर्धकांना क्रमांक न देता मानसन्मान आणि पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. JCI अकोट दरवर्षी असा सप्ताह साजरा करतो. संपूर्ण भारतामध्ये 9 ते 15 तारखेला हा सप्ताह साजरा करण्यात येतो, अशी माहिती जेसीआयचे अध्यक्ष अतुल भिरडे यांनी दिली. मन भारावून गेलं फॅशन शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक अंकिता गणगणे म्हणतात की, या सप्ताह मधला हा आगळा वेगळा कार्यक्रम होता. पहिल्यांदाच असा तृतीयपंथी फॅशन शो पाहिला आहे. हा शो बघून मन भारावून गेलं.  हेही वाचा-  पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO दरवर्षी सप्ताहाचे आयोजन गेल्या 42 वर्षापासून ही संस्था अकोटमध्ये दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करते. या सप्ताहामध्ये नवनवीन उपक्रम राबवले गेले आहेत. बफेलो ब्युटी काँटेन्स, बैलांचा फॅशन शो, डॉग शो, बुलेट राजा कॉम्पिटिशन, घोड्यांचा फॅशन शो, यावर्षी आमचा मानस होता की, तृतीयपंथी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोण लोकांचा बदलावा, त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांच्यातले कला गुण सर्वांपर्यंत पोहोचावे. या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सप्ताहाचे सप्ताहचे प्रमुख विकास चावडा यांनी सांगितले.
First published:

Tags: Akola, Akola News

पुढील बातम्या