मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : दिव्यांग कलाकारानं साकारला चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून ‘गणपती’

VIDEO : दिव्यांग कलाकारानं साकारला चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून ‘गणपती’

X
कुणी

कुणी पुस्तकांचा गणपती बनवितो, तर कुणी आणखी कशापासून गणपती बनवितो. परंतु, अकोल्यातील एका दिव्यांग कलाकाराने चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली आहे.

कुणी पुस्तकांचा गणपती बनवितो, तर कुणी आणखी कशापासून गणपती बनवितो. परंतु, अकोल्यातील एका दिव्यांग कलाकाराने चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

    अकोला : गणेशोत्सव काळात आपणाला निर्गुण निराकार असलेल्या बाप्पांची विविध रुप आणि आकारातील मूर्ती पहावयास मिळतात. कुणी पुस्तकांचा गणपती बनवितो, तर कुणी आणखी कशापासून गणपती बनवितो. परंतु, अकोल्यातील एका दिव्यांग कलाकाराने चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली आहे. या आगळ्यावेगळ्या बाप्पाच्या मूर्तीला पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. (Ganeshotsav 2022)

    अकोला शहरातील वीर भगतसिंग गणेश मंडळ मणकर्णा प्लाॅट यांचे यंदा 53 वे वर्ष आहे. या वर्षी गणेश मंडळाने क्रिकेटच्या साहित्यापासून गणपती साकारला आहे. या अगोदर पेन्सिल, नोटा, बांगड्या, बिस्कीट यापासून मूर्ती तयार केल्या आहेत. यंदा क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली असून ही मूर्ती चिखलदरा येथील संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

    आगामी विश्वचषक पाहता संकल्पना...

    टिल्लू टावरी या दिव्यांग कलाकाराने हा गणपती साकारला आहे. लहानपणापासूनच मूर्ती बनवायची टिल्लू यांना आवड होती. आपण बनवलेली मूर्ती पाहायला लोकांनी यावं, असे त्यांना नेहमी वाटत. तेव्हापासूनच त्यांना मूर्ती बनवण्याचा छंद लागला. गेल्या अनेक वर्षापासून गणपती उत्सवानिमित्त ते वेगवेगळ्या गणेश मूर्ती साकारतात. या अगोदर पेन्सिल, नोटांचा, बांगड्या, बिस्कीट यापासून मूर्ती तयार केल्या आहेत. सध्या सुरू असलेला आशिया कप आणि आगामी विश्वचषक पाहता यंदा क्रिकेटच्या साहित्याने गणराया साकारला आहे. ही मूर्ती नंतर चिखलदरा येथील संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

    हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

     22 लाखांच्या नोटांच्या गणपती

    अकोला शहरातल्या मणकर्णा प्लॉटमध्ये टिल्लू राहतात. त्यांना लहानपणापासूनच गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा छंद आहे. 1990 पासून त्यांनी मूर्ती बनवायला सुरुवात केली. गेल्या 32 वर्षापासून टिल्लू मूर्ती साकारत आहेत. सर्वात पहिले बांगड्यांची गणपतीची मूर्ती बनवली, नंतर रुद्राक्षाचा, केळांचा, भांड्यांचा, बिस्किटांचा, नोटांचा, पेन्सिलांचा गणपती साकारला. 11 लाखांच्या नोटांचा तसेच त्याहून मोठा 22 लाखांच्या नोटांचा गणपती बनवला होता. नोटांच्या गणपतीची त्यावेळी सर्वत्र चर्चा होती.

    1990 पासून त्यांनी मुर्त्या बनवायला सुरुवात केली...

    हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO

    मूर्तीसाठी दहा दिवसांचा कालावधी

    टिल्लू टावरी यांना क्रिकेटचा गणपती बनवण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. क्रिकेटचा साहित्य त्यांना प्रदीप नंद यांनी दिला आहे. प्रदीप नंद यांच्या चिखलदरा येथील गणपती म्युझियममध्ये हा क्रिकेटचा गणपती नंतर ठेवला जाणार आहे, अशी माहिती मूर्तिकार टिल्लू टावरी यांनी दिली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Akola, Akola News, Ganesh chaturthi