अकोला, 2 जून : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक ढाबे, हॉटेल्स, खानावळी दिसतात. त्यातील काही प्रसिद्धही असतात. असाच काहिसा अकोल्यातील कलकत्ता ढाबा प्रसिद्ध आहे, याचं कारण म्हणजे इथं मिळणारी तांदूळ अन् साबुदण्याची 'खीर'. अकोला-बाळापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Akola-Balapur National Highway) रिधोरा गावाजवळ हा कलकत्ता ढाबा आहे. तिथं मिळणाऱ्या चविष्ट खीर (Famous Kheer) पदार्थाविषयी जाणून घेऊया...
अकोला-खामगाव या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रिधोरा परिसरात कलकत्ता ढाबा हा प्रसिद्ध आहे. हा ढाबा 24 सुरू असतो. जर तुम्ही अकोल्यातून या महामार्गावर प्रवास करत असाल, 'कलकत्ता ढाबा' हा जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. मागील अनेक वर्षांपासून हा ढाबा ग्राहकांनी सेवा देतो आहे. तुम्ही इथं पंजाबी आणि खाद्य (Famous Food) पदार्थाचा आनंद घेऊ शकता.
वाचा : भारतीय कॅप्टन ते न्यूझीलंडचा ऑल राऊंडर, वर्ल्ड कप गाजवण्यासाठी अमेरिकेची Playing 11 सज्ज
या ढाब्यावर खाटांची व्यवस्था आहे. या खाटांवर बसलं की, भूकेची जाणीव नक्कीच होते. कारण, चविष्ट पदार्थांचा येणार वास. इथं आल्यानंतर ऑर्डर दिली आणि ऑर्डर समोर आली की, उदरभरणाच्या एका चवदार आणि मधूर सोहळ्याला आपोआप सुरुवात होईल. पण, या ढाब्याचं वैशिष्ट्य हे आहे की, इथं चविष्ट अशी खीर मिळते. तुमच्या प्रवासातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी ही तुम्ही नक्कीच चाखली पाहिजे. अख्ख्या प्रवासात खिरीचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो, हे मात्र नक्की.
ही चविष्ट खीर नेमकी बनवतात कशी?
या खिरीसाठी लागते तांदूळ, साबुदाणा, दूध आणि ड्रायफ्रुट. खिरीसाठी तांदूळ आणि साबुदाणा भिजवला जातो. नंतर ते चुलीवर शिजवले जाते. ही खीर चुलीवर मंद आचेवर शिजवले जाते. ही खीर शिजण्यासाठी तब्बल 8 ते 10 तास लागतात. त्यानंतर खीर फ्रिजमध्ये ठेवली जाते. नंतर फ्रिजमधील खीर ग्राहकांसाठी उपलब्ध होते.
खिरीचे चव चाखलेले ग्राहक सांगतात की, आपण अनेक ढाब्यावर वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतो. पण, या ढाब्यावरील खिरीची चव ही लक्षात राहते. ही आमची फेव्हरेट डिश आहे. या मार्गावरवरून प्रवास करताना आम्ही इथं नक्की थांबतो आणि खीर आवर्जुन खातो."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola News