Akola : “आता बॅंकेत चकरा मारणंही परवडेना…”; जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित, VIDEO
Akola : “आता बॅंकेत चकरा मारणंही परवडेना…”; जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित, VIDEO
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीचा सामना करावा लागतो. नुससाणीची भरपाई मिळावी यासाठी दरवर्षी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गंत विमा भरतात. 2021 ते 2022 या वर्षात भरलेल्या विमाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा कार्यालयात चकरा मारत आहेत.
अकोला, 7 जुलै : विमा हप्ता भरूनही जिल्ह्यातील शेतकरी मात्र पीक विम्यापासून (crop insurance) वंचित राहतो. पीक विम्याचे पैसे घेऊन विमा कंपन्या मालामाल होत आहेत. तर दुसरीकडे शेतकर्याची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे. पीक विमा भरूनही शेतकर्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत. जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकर्यांच्या (farmers) बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
अकोला शहरातील केशवनगर स्थित प्रधानमंत्री पीक विमा कार्यालयात शेतकरी विम्याबाबत विचारपूर करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा कार्यालयाकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. तुमचा विमा हा खात्यात जमा झाला आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले जाते. शेतकरी बँकेत गेला असता तिथे बॅंक स्टेटमेंट्स काढले असता खाते रिकामेच असल्याचे समजते. सध्या खरिपाच्या पेरणीचे दिवस सुरू आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठा खर्च झाला आहे. गेल्यावर्षी देखील असाच खर्च झाला होता. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी उसनवारी करीत पीक विमा कंपन्या आणि शासनाकडून मदत मिळेल या उद्देशाने, सर्वरच्या समस्येमुळे रात्रभर उभे राहून विमा भरला होता. मात्र, अद्यापही विम्याचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. प्रधानमंत्री पीक विमा सुविधा केंद्राकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वाचा-Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीचा सामना करावा लागतो. नुससाणीची भरपाई मिळावी यासाठी दरवर्षी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गंत विमा भरतात. 2021 ते 2022 या वर्षात भरलेल्या विमाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, विमा कार्यालयात गेल्यावर शेतकऱ्यांना तुमचे पैसे जमा झाल्याचे सांगितले जाते पण जेव्हा शेतकरी बँकेत जावून तपासणी करतो तेव्हा खात्यावर काहीच जमा नसल्याने बॅकेकडून सांगितले जाते.
“पन्नास रुपये भाडं खर्चून कार्यालयात चकरा”पेरणीचे दिवस आहेत. पैशाअभावी पेरणीसाठी बियाण्याची सोय नव्हती. इकडून तिकडून उधार पैसे घेऊन शेती पेरली. अनेक वेळा चकरा मारुनही आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पन्नास रुपये भाडं खर्चून महिन्यातुन अनेक वेळा आम्ही विमा कार्यालय, बॅंकेत चकरा मारतो. पण आता चकरा मारणंही परवडेना. या ठिकाणी समाधानकारक अशी उत्तरे मिळत नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार दिल्याचे शेतकरी सांगतात.वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO“चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील”उपजिल्हाधिकारी संजय खडसे सांगतात की, गेल्यावर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमच्याकडे केल्या आहेत. पीक विमा आणि बँकेचे प्रतिनिधी याचं म्हणणे ऐकून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारींचं निवारण करत असतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडू चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.