अकोला 17 जून : पावसाळा (Monsoon) सुरू झाला की आपल्याला सर्वात अगोदर आठवते ती म्हणजे छत्री, रेनकोट आणि पावसापासून आपल्या गाड्यांचा बचाव करण्यासाठी ‘सीट कवर’ (bike seat cover). गाडीचे शीट भिजले की चांगलीच तारांबळ उडते त्यामुळं वाटरप्रूफ शीट कव्हर लावणे आवश्यक आहे. अद्याप पावसाने सुरुवात केली नसली तरी हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे काही तासांत पाऊस पडणार असून शहरात सीट कव्हरची मोठ्या प्रमाणात दुकाने (bike seat cover market in Akola) लागली आहेत. पावसाळ्याची पुर्वतयारी म्हणून नागरिक सीट कव्हर खरेदीसाठी बाहेर पडत असून मागणी देखील वाढली आहे.
सीट कव्हरचा व्यवसाय तसा बाराही महिने चालणारा आहे ,पण एक-दोन पावसाचं पाणी पडताच मोठ्या प्रमाणात ग्राहक वाढतो. यात कुशन रेगझिन, पंनी, गाडी झाकण्यासाठी लागणारे कव्हर, टॅंक कव्हर अशा भरपूर कव्हरची मागणी वाढते. पावसामुळे गाड्यांवडरील कव्हर लवकर घराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात सीट कव्हरची अधिक विक्री होते, आमच्याकडे बाटा, टंबू कव्हर, रेगझिन कव्हर, टॅंक कव्हर अशी वेगवेगळ्या प्रकारची कव्हर विक्रीसाठी असल्याची माहिती कुशन विक्रेता आशिष कांबळे यांनी दिली.
हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?
आशिष यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेलं असून शिक्षणानंतरही नोकरी न मिळाळ्याने त्यांनी अकोला शहरात रस्त्यावर्ती सीट कव्हर विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सीट कव्हर विक्रीच्या व्यवसायातून चांगला प्रकारे रोजंदारी मिळते. शिक्षण घेतल्यानंतर जर नोकरी मिळालीच नाही तर प्रत्येकाने काही तरी व्यवसाय केला पाहिजे यामुळे कोणी बेरोजगार राहणार नाही. आपलं पोट भरेल एवढी कमाई तरी व्यवसायातून होवू शकते, असं देखील आशिष यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.