Home /News /maharashtra /

Akola : पावसाचं थैमान, पिकं सडली; “मायबाप सरकार मदत द्या!” VIDEO

Akola : पावसाचं थैमान, पिकं सडली; “मायबाप सरकार मदत द्या!” VIDEO

पावसाचं

पावसाचं थैमान, पिकं सडली

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे. नद्या-नाल्यांचे पाणी शेतात पसरले आहे. नदी-नाल्या काटची शेती पाण्याने सडत आहे.

  अकोला, 15 जुलै : गेल्या पाच दिवसापासून अकोला जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे (rain) पिकांना संजीवनी मिळाली असली तरी काही तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने अंकुरलेले पिके सडण्याच्या मार्गावर (Crops rotted due to rain) आहेत. खरिपातील उडीद, मूग, कपाशी, सोयाबीन पीक पाण्याखाली आले आहेत. जर आणखी काही दिवस असाच पाऊस राहिला तर हे पीक पूर्णत: नष्ट होण्याची भीती आहे. सरकारने नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी (Farmers) करीत आहे.  जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे. नद्या-नाल्यांचे पाणी शेतात पसरले आहे. नदी-नाल्या काटची शेती पाण्याने सडत आहे. शेतीची कामे देखील ठप्प झाली आहेत. काही भागात तर पाण्याने पिकासह माती देखील वाहून जात आहे. अगोदरच दुपार पेरणीचे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा या रिमझिम पावसाने फटका बसला. संबंधित विभागाने लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करावी आणि तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.  वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO
   “मायबाप शासनाने मदत करावी”
  माझ्याकडे दोन एकर शेती आहे. शेतीशिवाय माझा कोणताही दुसरा व्यवसाय नाही. यावेळी शेतात कापसाची पेरली केली. मात्र पावसाने शेतातील कापसाचे पीक पाण्याखाली गेलं आहे. डोळ्यादेखत पाण्यानं पीक सडत असून यावर आम्ही काहीही करू शकत नाही. हे पीक पूर्ण नष्ट झाले तर आम्ही खायचं काय? पिकासह मातीही वाहून जात आहे यामुळे आमच्यावर मोठे संकट कोसळले असून मायबाप शासनाने मदत करावी अशी मागणी रामेश्वर पोहरे या शेतकऱ्याने केली आहे. उरळ येथील शेतकरी रामकृष्ण घोडतकार यांचे देखील पीक पावसाने पाण्याने सडत आहे. रामकृष्ण यांच्याकडे पाच एकर शेती आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे पाचही एकरावरील पिकाचे नुकसान झाले आहे.  “नुकसानीची पाहणी करुन पंचनामे होतील” सलग पाच दिवस झाले अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. बाळापूर तालुक्यात अधिक पाऊस होत आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन व उडिदासह खरिपाच्या सर्वच पिकांवर पाण्याचा परिणाम होत आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. पाऊस उघडल्यानंतर अंतिम आकडेवारी आपल्याकडे प्राप्त होईल. नुकसान झालेल्या ठिकाणाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कांतप्पा खोत यांनी दिली.
  First published:

  Tags: Akola, Akola News, Farmer, Rain, पीक, शेतकरी

  पुढील बातम्या