Home /News /maharashtra /

Akola : अतिवृष्टी, वाणी किडी, अन् वन्यप्राण्यांमुळे पिके उद्ध्वस्त; ''आता व्याजाचे पैसे फेडायचे कसे?''

Akola : अतिवृष्टी, वाणी किडी, अन् वन्यप्राण्यांमुळे पिके उद्ध्वस्त; ''आता व्याजाचे पैसे फेडायचे कसे?''

अतिवृष्टी,

अतिवृष्टी, वाणी किडी, अन् वन्यप्राण्यांमुळे पिके उद्ध्वस्त

हरिण रानडुकरे, काळवीट यांचा समूह रात्रीच्यावेळी एकत्र येऊन शेतातील पिकांचे शेंडे खात आहेत. उसनवारी, व्याजाच्या पैशाने केलेली पेरणी आणि आता उभं पिक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    अकोला, 21 जुलै : लांबलेल्या पावसाने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी (Kharif Sowing) उशीर झाला. जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली. दमदार पावसामुळे पिक जोमात आली. मात्र कोवळ्या पिकांवर वाणी (पैसा) किडीने हल्ला (Millipede Attack) केल्याने सोयाबीन, उडीद, मूग कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आले आहे. हे कमी की काय म्हणून हरिण, रानडुकरे, काळवीट या वन्य प्राण्यांनी (wild animals)  देखील पिकांचे नुकसान (Crops damaged) करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  शेती म्हटलं तर शेतकऱ्यांसमोर अडचणी आणि संकटे काय नवीन नाहीत. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यापासून जे पिक वाचले आहे त्या पिकांवर नवीनच संकटे आली आली आहेत. वाणी किडीने पिकांवर हल्ला चढवला असून उभी पिके फस्त केली आहेत. त्यातच मागील आठवड्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना घराबाहेर निघता आले नाही. शेतकरी शेतात जाऊ न शकल्याने शेतात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला.  हरिण रानडुकरे, काळवीट यांचा मोठा समूह रात्रीच्यावेळी एकत्र येऊन शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. उसनवारी, व्याजाच्या पैशाने केलेली पेरणी आणि आता उभं पिक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून यात मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. मायबाप सरकारने आमच्या नुकसानीची पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त  मान्सूनचा पाऊस यंदा उशीरानं दाखल झाला माझ्याकडील दोन एकरावर 15 जूनला पेरणी केली. यावर्षी पिके जोमात आली होती. मात्र, गेल्या 15 दिवसापासून पावसाने थैमान घातले. यासह वन्य प्राण्यांनी पिकांची शेंडे खाऊन पिक नष्ट केले असल्याचे मोरगाव भोकरे येथील शेतकरी रामदास जवंजाळ सांगतात. अशीच काहीशी परिस्थिती शेतकरी  कैलास माळी यांची असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO मोरगाव भोकरे गावात हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांमुळे, वाणी या किडीमुळे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची उभे पिक उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी  सरपंच उमा माळी यांनी केली आहे.
    First published:

    Tags: Akola, Akola News, Farmer, Rain, पीक, शेतकरी

    पुढील बातम्या