मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : हद्दवाढ केली पण सुविधांचे काय? घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Video : हद्दवाढ केली पण सुविधांचे काय? घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील हद्दवाढ भागातील रस्ते चिखलात गेले आहेत. नागरिकांची चिखलातून रस्ता शोधताना दमछाक होत आहे. या भागात रस्ते, नाल्या, लाईटची समस्या आहे.

अकोला, 15 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शहरातील हद्दवाढ भागातील रस्ते चिखलात गेले आहेत. नागरिकांची चिखलातून रस्ता शोधताना दमछाक होत आहे. या भागात रस्ते, नाल्या, लाईटची समस्या आहे. घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काम करून पोट भरायची की आजारामुळे दवाखान्यात पैसा भरायचा हेच कळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राहुल नगराचा पालिका हद्दीतील समावेशानंतर रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता आदी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, या वार्डाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या हद्दवाढीत अकोला शहराबाहेरील बराचसा भाग आलेला आहे. यात शिवनी येथील राहुल नगर भागाचीही समावेश झालेला आहे. घाणीमुळे आजाराला आमंत्रण राहुल नगरात रहिवासी राहतात. पण त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा महानगरपालिकेकडून पुरवल्या जात नाहीत. या वार्डासाठी रस्ता नाही, सांडपाणी, पावसाचे पाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत. यामुळे पावसाचे व सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे. साठलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डेंगू, मलेरिया सारखे आजार देखील येथील नागरिकांना होत आहेत.  तक्रार करूनही दुर्लक्ष सुविधांपासून वंचित असलेले येथील नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. राहुल नगरात कुठेही फिरा, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, साफसफाई नाही, सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही. हेही वाचा-  पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO पोट भरायची की…  समस्यांबाबत नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन, तक्रारी दिल्याचे नागरिक सांगतात. पण अजूनही कुठल्याच प्रकारची सुविधा नागरिकांना प्रशासनाकडून पुरवली गेली नाही. या भागात  मोलमजुरी करून पोट भरणारे सामान्य नागरिक राहतात. काम करून पोट भरायची की आजारामुळे दवाखान्यात पैसा भरायचा हेच कळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लवकरच उपाययोजना केल्या जातील महानगरपालिकेचे अधिकारी प्रशांत राजूरकर यांच्याशी संपर्क सांधला असता त्यांनी सांगितले की, राहुल नगर हा नवीन हद्दवाढ झालेला भाग आहे. येथील नाल्यांचे काम अद्याप झालेले नाही. यावर्षी पाऊस अधिक होत असल्याने पाणी साचून राहत आहे. या पावण्यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. परिसरातील आरोग्य निरीक्षकाला देखील कळवले असून साफसफाई देखील केली जाईल.  
First published:

Tags: Akola, Akola News

पुढील बातम्या