मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कार्टून ते लग्नपत्रिकेपर्यंत आकर्षक डिझाईन करणारी 'घोंगडे की दुनिया', 32 वर्षांचा कलात्मक प्रवास VIDEO

कार्टून ते लग्नपत्रिकेपर्यंत आकर्षक डिझाईन करणारी 'घोंगडे की दुनिया', 32 वर्षांचा कलात्मक प्रवास VIDEO

X
गजानन

गजानन घोंगडे यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे.

गजानन घोंगडे यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Akola, India

  अकोला, 25 ऑगस्ट : अकोला शहरातील गजानन घोंगडे (Gajanan Ghongde) यांची व्यंगचित्रकार म्हणून ओळख आहे. गेल्या 32 वर्षापासून त्यांनी आपली कला जोपासत अनेक व्यंग चित्रांचे रेखाटन केले आहे. त्यांनी रेखाटलेली राजकीय घडामोडीवरील आधारित व्यंगचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली आहेत. गजानन घोंगडे (Ghongde Ki Duniya) यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या व्यंगचित्र मालिकेचे त्यांनीही कौतुक केले आहे.

  गजानन घोंगडे यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सची पदवी घेतलेली आहे. त्यांनी पहिले राजकीय व्यंगचित्र 1990 मध्ये रेखाटले. ते एका वृत्तपत्रांमध्ये छापून आले. गेल्या 32 वर्षांपासून घोंगडे व्यंगचित्र काढतात. गजानन घोंगडे हे राजकीय चालू घडामोडी वर व्यंगचित्र काढतात आणि त्याला वाव ही मिळतो. कलाक्षेत्रातील प्रवास अपघाताने सुरू झाला. स्कूल ऑफ आर्ट्सला शिकत असताना फायनल आणि इंटर्नल पॉलीटिक्समध्ये नापास झालो. त्यानंतर अकोल्यात आलो आणि कार्टून काढण्याला सुरुवात केली. परीक्षेला वेळ असल्याकारणाने वेळचं वेळ होता. वडिलांना पॉलिटिकल मॅगझिन वाचण्याची आवड होती. त्यामुळे घरी राजकीय मासिक, वृत्तपत्र यायची. यामुळे मलाही वाचनाची आवड निर्माण झाली. जास्त वाचन राजकीय घडामोडी वरच व्हायचं. त्यामुळेच विचारांची पार्श्वभूमी तशीच बनत गेली असल्याचे गजानन यांनी सांगितले.

  ब्रश हे तुझं शस्त्र

  सुरूवातीच्या काळात तत्कालीन राजकारणावर लेख लिहिला. मात्र, वडिलांना तो आवडला नाही. ब्रश हे तुझं शस्त्र आणि तू तेच कर, अस त्यावेळी वडिलांनी सांगितले. मग 1990 साली त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर एक व्यंगचित्र काढलं. ते एका वृत्तपत्रांमध्ये छापूनही आलं. मात्र, आपलं व्यंगचित्र वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याच आधी कळालं नव्हत. वडिलांनी दुकानातून साखर आणली. ती साखर एका कागदी पुडीत होती. आणि त्याच कागदावर माझं व्यंगचित्र होतं. ते व्यंगचित्र पाहून आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेव्हापासूनच व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. आज या कलेला 32 वर्षे पूर्ण झाली असल्याचे गजानन (संपर्क क्रमांक- 9823087650) यांनी सांगितले.

  हेही वाचा- भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos

  घोंगडी की  दुनिया

  तीन वर्ष वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काम केलं. त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सच्या शिक्षणावर डिझायनिंग आणि प्रिंटिंगचा व्यवसाय उभारला. या व्यवसायाला घोंगडी की  दुनिया असे नाव दिले. अकोला शहरातल्या निशांत टावरमध्ये गजानन घोंगडे नावाने कार्यालय असून या ठिकाणाहून व्यवसाय चालतो. कार्टून सोबत मॅगेझिनच्या डिझाईन, लग्नपत्रिका, मेमंटो तयार केले जातात.

  हेही वाचा- कपिला'च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos

  आतापर्यंत चार पुरस्कार

  गजानन घोंगडे यांना आतापर्यंत चार पुरस्कार मिळाले आहेत. विदर्भस्तरीय व्यंगचित्र पुरस्कार, माया कामत स्मृती व्यंगचित्रकार पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, राष्ट्रीय जाहिरात आरेखन स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, तर आता दिल्ली येथे दिल्लीच्या अन फुल ड्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे क्रिएट अ विटा या नावाने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेला आहे. गजानन घोंगडे हे अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन असून त्यांनी अमिताभ बच्चन यांच एक पेंटिंग काढले असून हे पेंटिंग अमिताभ बच्चन यांना गिफ्ट दिले आहे.

  First published:
  top videos

   Tags: Akola, Akola News