अकोला 2 जून : अकोल्यातील स्वप्निल तायडे हे पुण्यात नोकरी करत होते. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने काही तरी व्यवसाय करावा म्हणून त्याने पुण्यासारख्या शहरात पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला होता. बघता बघता सिने अभिनेता आणि सिने अभिनेत्री यांनादेखील स्वप्निलच्या पाणीपुरीने आकर्षित केले. आता हीच सिनेस्टार्सची आवडती पुण्याची पाणीपुरी अकोल्यातील खवय्यांसाठी स्वप्निल तायडे यांनी उपलब्ध करून दिली आहे.
स्वप्नील तायडे हे मूळचे अकोला येथील आहेत. स्वप्निल गोविंद तायडे यांनी इंजिनीयरचा डिप्लोमा करून काही वर्षे पुण्याला नोकरी केली. त्यांच्या आई पुष्पा तायडे यांना विविध पदार्थ बनविण्याची आवड होती. नेमका हाच गुण स्वप्निल यांच्या अंगी उतरला. त्यांच्यामुळे आज अकोलेकरांना स्वादिष्ट पाणीपुरीचा आस्वाद घ्यायला मिळत आहे.
वाचा : MH Board 10th and 12th Result: अखेर प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात बारावीचा निकाल होणार जाहीर
खरं तर स्वप्नील तायडे यांनी कोणताही हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स केलेले नाही. आईच्या पदार्थ बनविण्याच्या वारशामध्ये त्यांची पत्नी भारती तायडे यांनी भर घातली. त्यांनी पतीच्या व्यवसायात साथ दिली. विशेष म्हणजे भारती ह्या 'डबल ग्रॅज्युएट' आहेत. या तायडे दाम्पत्याने 'डीएसपी' अर्थात दीपाली, सोनाली आणि पल्लवी या बहिणींच्या नावाने सिने स्टार्सची आवडती पाणीपुरी अकोल्यातील तापडिया नगरात उपलब्ध करून दिली आहे.
अकोल्यातील सर्व खवय्यांची गर्दी आता या डीएसपी पाणीपुरीकडे वळत आहे. अकोल्यातील ही पाणीपुरी ग्राहकांच्याप्रचंड पसंतीस उतरत आहे. जसा मुंबईचा वडापाव प्रसिद्ध आहे तशीच अकोल्याची पाणीपुरीसुद्धा प्रसिद्ध आहे. अकोला शहरात सुमारे 300 हून अधिक पाणीपुरीची दुकाने असली तरी 'डीएसपी ' पाणीपुरीने अगदी कमी वेळातच अकोलेकरांना भुरळ घातली आहे.
पुण्यात या सिनेस्टार्सनी घेतलाय आस्वाद
सिने अभिनेता आणि सिने अभिनेत्री यांच्या आवडीची पाणीपुरी ठरली आहे. आतापर्यंत अभिनेता सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर, योगेश सोमण, शंतनू मोघे, प्रिया मराठे, ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर, तेजस बर्वे, प्रसिध्द सिने दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्गजांनी पुण्यात येऊन 'डीएसपी' पाणीपुरीचा आस्वाद घेतला आहे. अगदी कमी वेळातच अकोलेकरांना भुरळ घालणारी डिएसपी पाणीपुरी आता अमरावती, बुलडाणा,वाशिम, अशा अनेक जिल्ह्यांतही पार्सल पाठवली जात आहे.
... अशी आहेत पाणीपुरीची वैशिष्ट्ये
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे स्वच्छता, एक वेगळी चव, चणे, मटकी, मूग, लिंबू हे साहित्य असते. त्याचबरोबर हवे तेवढे तिखट आणि हेवी तेवढी गोड पाणीपुरी तयार करून दिली जाते. हॅन्डग्लोजचा वापर केला जातो आणि त्यात म्हणजे एक शेवटची स्पेशल तिखट पुरी, तर डोळ्यातून पाणी आणणारी असते. पण, तितकीच चवीलादेखील असते. अनेक ग्राहक तर ही स्पेशल तिखटवाली पाणी पुरी खायला येतात. 'डीएसपी' पाणीपुरी गोड किंवा आंबट लहान मुलांची आवडती आहे. अकोलेकरांना भुरळ घालणाऱ्या या डीएसपी पाणीपुरीचा आस्वाद घ्यायला नक्की या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.