अकोला, 25 ऑगस्ट : तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील वारी हनुमान गावानजीक तलावावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला तापलेल्या सळईचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे. (Akola Crime) दरम्यार सळईने चटके दिलेल्या युवकाने वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. धूळघाट रेल्वे (ता. धारणी) गावातील या जखमी युवकाने पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या जबाबावरून धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अंकुश गोरेलाल मावस्कर असे जखमी युवकाचे नाव आहे. अंकूशने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या सोनाळा वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या जागेत आल्याबद्दल त्याला आणि दोन मित्रांना अटक केली. आनंद रामेश्वर कासदेकर (25), पप्पू चव्हाण (30) यांच्यासोबत घरातून निघाला ते फिरत फिरत तर सायंकाळी सहा वाजता तलावावर पोहोचले. दोघे तलावाच्या काठावर बसले होते, तर अंकुश जाळे टाकण्याकरिता उतरला होता. एक मासोळी गळाला लागताच त्याने मित्रांना चूल मांडून कालवण करण्यास सांगितले.
हे ही वाचा : Cotton Rate : कापसाच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्यांना अच्छे दिन तर सूत गिरण्या संकटात?
दरम्यान काही वेळाने सोनाळा वनक्षेत्रपलातील अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मित्रांना अंकुशला आवाज देण्यास सांगितले, तो चुलीजवळ येताच पाच ते सात जणांनी त्याला पकडले व कोअर क्षेत्रात का आला, असे म्हणून त्याचे हात पाय पकडून गरम सळईचे चटके हातावर, पायावर, मांडीवर, पोटावर, त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून निघून गेल्याचे तक्रारदार अंकुशने पोलिसांना माहिती दिली.
शुद्धीवर आल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अंकुश मावस्कर हा गावी धूळघाट रेल्वे येथे पोहोचला. सकाळी साडेसात वाजता गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले.
हे ही वाचा : महाराष्ट्रापासून अफगाणिस्तानपर्यंत जमीन हादरली; जम्मू काश्मीरमध्ये 72 तासात 7 वेळा भूकंप
याबाबत रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली आहे. धारणी पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला व तो हिवरखेड (ता. अकोट) पोलिसांना वर्ग केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंकुशच्या दोन मित्रांना वनविभागाने अटक केल्याचे स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Crime news, Forest