भाजपच्या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'चा फायदा, अकोल्यात वर्चस्व

भाजपच्या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'चा फायदा, अकोल्यात वर्चस्व

निवडणुकीदरम्यान भाजपचे सात सदस्य अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला.

  • Share this:

कुंदन जाधव, अकोला, 30 जानेवारी : अकोला जिल्हा परिषदेत सभापतीपदांच्या निवडणुकीत भारिप-बमसंने वर्चस्व कायम ठेवत चारही सभापतीपदांवर कब्जा केला. निवडणुकीदरम्यान भाजपचे सात सदस्य अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला. त्यामुळे भारिपने या निवडणुकीत 25 विरुद्ध 21 मतांनी विजय मिळविला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत दुपारी 1 वाजेपर्यंत भारिपच्या वतीने महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी मनीषा बोर्डे, समाज कल्याण सभापती पदासाठी आकाश शिरसाट व दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी पंजाबराव वडाळ व चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी काँग्रेसकडून अर्चना राऊत, समाज कल्याण सभापती पदासाठी शिवसेनेकडून डॉ. प्रशांत आढावू व विषय समिती सभापती पदांसाठी राष्ट्रवादीकडून सुमन गावंडे आणि अपक्ष गजानन फुंडकर यांनी अर्ज दाखल केले होते.

काँग्रेस मंत्र्याची राज ठाकरेंच्या मनसेवर जोरदार टीका, मोर्चाआधी मुंबईत रणकंदन

निवडणूक प्रक्रिया अंतर्गत दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या 21 सदस्यांनी मतदान केले तर भारिप-बहुजन महासंघाच्या 25 सदस्यांनी मतदान केले.

हेही वाचा - नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींचा विचार एकसमान, राहुल गांधींचं खळबळजनक विधान

मतदानानंतर विजयी उमेदवारांचे नाव जाहीर करताच भारिपच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

भाजप पुन्हा किंगमेकर

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सात सदस्यांनी मतदानाची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले होते. परिणामी बहुमताचा आकडा 47 झाला. त्यामुळे भारिपचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे उमेदवार 25 विरूद्ध 21 मतांनी विजयी झाले. सभापती पदांच्या निवडणुकीत सुद्धा मतदानादारम्यान भाजप सदस्य गैरहजर राहिल्याने त्याचा फायदा भारीपला झाला.

असे आहे पक्षीय बलाबल

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंचे 22 सदस्य निवडून आले आहेत. एक विजयी उमेदवार भारिप पुरस्कृत आहे. दोन अपक्षांनी सुद्धा भारिपला पाठिंबा दिल्यामुळे भारिपकडे एकूण 25 सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 3, कॉंग्रेसचे 4 आणि एक अपक्ष मिळून आघाडीचं एकूण संख्या 21 पर्यंत पोहचलं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहिर्गमन करणाऱ्या भाजपकडे 7 सदस्य आहेत.

First published: January 30, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या