मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पावसाच्या पाण्यातून बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं भारी !, बघा व्हिडिओ

पावसाच्या पाण्यातून बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं भारी !, बघा व्हिडिओ

असं म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती... अशीच एक घटना अकोला (Akola) जिल्ह्यात घडली आहे. एका तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे.

अकोला, 14 जून: असं म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती... अशीच एक घटना अकोला (Akola) जिल्ह्यात घडली आहे. एका तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. पावसाच्या पाण्यातून बाईक घेऊन जाणं त्या तरुणाच्या चांगलंच जीवावर बेतलं असतं. केवळ पोहता येत असल्यानं एक तरुण बुडताना (young man drowned) वाचला आहे. मात्र पावसाच्या पाण्यातून बाईक चालवणं हा स्टंट या तरुणाच्या चांगलाच जीवावर बेतला असता.

अकोला जिल्ह्यातही पावसाचा कहर पाहायला मिळाला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं होतं. बार्शी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सकनी लोहगड मार्गाजवळ पूर आल्यासारखी परिस्थिती उद्भवली होती. त्यात या मार्गाजवळ असलेल्या या पुलावरुन एक तरुण आपल्या बाईकवरुन जात असताना वाहून गेला. पाण्याचा जोर असल्यानं तरुण आणि त्याची बाईक पाण्यात वाहून गेली. या घटनेचा व्हिडिओ (Video Viral) आता समोर आला आहे.

ही घटना 10 जूनची असल्याचं समजतलं. या व्हिडिओत दिसतंय की तरुण कसा पाण्यात वाहून जात आहे. मात्र केवळ या तरुणाच नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. या तरुणाला पोहता येत असल्यानं त्यानं किनारा गाठला. आणि तेथे उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला मदतीचा हात दिला.

First published:
top videos

    Tags: Akola News, Rain, Video viral