अकोला, 30 जुलै: देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. सुरुवातील लॉकडाऊनमुळे घरात सगळं नीट चालू असतानाच हळूहळू खटके वाढण्यास सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे बरेचजण आता तणावात गेल्याचं पाहायला मिळत आहे. या स्थितीचा परिणाम कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर होताना पाहायला मिळाला.
घरात वाढणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे एका महिलेला फेसबुकचा आधार वाटला आणि तिची फेसबुकवर एक तरुणीशी ओळख झाली. या तरुणीसोबत हळूहळू बोलणं वाढत गेलं आणि तिचा आधार वाटू लागला. दोघींमधलं मैत्रीचं नातं अधिक घट्ट होत गेलं आणि घरातल्या समस्या आणि वैवाहिक जीवनातील कलह, सुख दु:ख एकमेकींना सांगायला सुरुवात केली.
हे वाचा-कोरोनाच्या संकटात ‘या’ राज्याने 8.36 रुपयांनी स्वस्त केल्या डिझेलच्या किंमती
फेसबुकवर मैत्रिणीनं दिलेला सल्ला आणि तिचं म्हणणं हळूहळू या महिलेला पटायला लागलं आणि या महिलेवर त्याचा प्रभाव पडू लागला. एकमेकांना प्रत्यक्षात ओळखत नसतानाही या महिलेनं अनोळखी असणाऱ्या या मैत्रीणीचा सल्ला ऐकला आणि नवरा आणि 2 वर्षांचा मुलीला सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनाही महिलेच्या या निर्णयानं धक्का बसला घरच्यांनी या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही फेसबुकच्या मैत्रिणीनं सांगितलेल्या गोष्टीचा प्रभाव काही उतरला नाही.
अखेर महेरच्यांनी आपल्या मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. भरोसा सेलनं या महिलेला आश्रय दिला आणि तिचं समुपदेशन केलं. अकोला पोलिसांनी या प्रकरणी महिलेला एका वसतिगृहात आश्रय दिला आहे.