राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा अकोल्यात अडवला, मोठी वाहतूक कोंडी

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा अकोल्यात अडवला, मोठी वाहतूक कोंडी

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा ताफा अडवला.

  • Share this:

अकोला, 20 फेब्रुवारी : पालकमंत्री बच्चू कडू आज आपल्या नियोजित दौऱ्यावर अकोल्यात आले होते. एमआयडीसीतील कार्यक्रम आटपून ते पुढील कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी पालकमंत्री कडू यांचा ताफा अडवला.

कृषी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करणे आणि शैक्षणिक व इतर शुल्क वस्तीगृह शुल्कासह कमी करून बंद झालेली शिक्षक सवलती सुरू करण्याची मागणी दरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केली. अमरावती-अकोला मुख्य मार्ग असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ताफा अडविण्यात आल्याने येथे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जलसंपदा आणि लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवारी अकोला दौऱ्यावर आहेत. एमआयडीसी असोसिएशनचा कार्यक्रम आटपून ते एका खाजगी कार्यक्रमाला निघाले होते.

'नाणार'वरून शिवसेनेत दुफळी, कोकणात 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोर पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनासमोर जाऊन ताफा अडवला. यावेळी विद्यार्थी असल्याचे पाहून पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः गाडीतून उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेतल्या आणि यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

First published: February 20, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading