Home /News /maharashtra /

देवमाणूस ! बुडणाऱ्या तरुणाला पाहून गौरवने उडी घेत वाचवले प्राण

देवमाणूस ! बुडणाऱ्या तरुणाला पाहून गौरवने उडी घेत वाचवले प्राण

Youth saves life of two who were drawing: मागील दोन आठवड्यात रंजीत गाडेकर यांनी एका शुभम युवकाचा व एका महिलेचे प्राण वाचवले.

अकोला, 16 ऑगस्ट : अकोल्यातील पातुर घाटाच्या (Akola Patur Ghat) सानिध्यात वसलेल्या धोधानी पर्यटन (Dhodani) परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक तरुण बुडत होता. बुडणाऱ्या युवकाने सर्वांना मदतीची हाक दिली परंतु तेथील उपस्थितीत असलेल्या त्या तरुणाच्या मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचवेळी बाजूला झाडा खाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ (Gaurav Suresh Shrinath) याने हे पाहिले आणि मदतीसाठी धाव घेतली. गौरव श्रीनाथ याने हवेने भरलेले टयुब युवकाकडे फेकले परंतु सदर युवकाला ते पकडता आले नाही ते बघताच गौरव ने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले. मागील आठवड्यात धोदाणी धबधबा पर्यटन बघण्याकरिता अकोला येथील दाते परिवार सुद्धा आला होता. त्या परिवारातील महिला कविता पाण्याजवळ गेल्या असता त्यांचा पाय घसरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जावू लागल्या. "दिल्लीत एकत्र येणारे मोदी विरोधक नाही तर भ्रष्टाचारी आहेत" यावेळी तेथे उपस्थित असलेला युवक रंगीत गाडेकर याने सुद्धा पाण्यामध्ये उडी घेऊन महिलेला पाण्याच्या बाहेर आणले. त्यानंतर त्याने धोदानी येथे आणून त्यांच्या वैयक्तिक गाडी पर्यंत पोचविले. त्वरित त्यांना उपचाराकरिता अकोला येथे रवानगी केली. मागिल आठवड्यामध्ये अकोला येथील रहिवासी शुभम नावाचा मुलगा घसरून पडल्याने त्याचे सुद्धा प्राण रणजित गाडेकर यांनी वाचवले. या कार्यामुळे गौरव आणि रणजीत या तरुण युवकांनी केलेल्या कार्याबद्दल सगळीकडे कौतुकास्पद कार्य केल्याची प्रशंसा होत आहे. अशा शूर तरुणांची या देशाला गरज आहे. 15 ऑगस्टच्या दिवशीच दुपारी 3.30 वाजता या शौर्याची प्रचिती आली आणि गौरवचा साधेपणा यातून दिसून येतो की ज्या तरुणाचे त्याने प्राण वाचविले त्याचे नाव सुद्धा त्याला माहिती नाही.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Akola

पुढील बातम्या