अकोला, 10 एप्रिल : अकोल्यातील (Akola) निंबा फाटा इथं भरधाव कारने (Car accident) दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी इंडोगो गाडी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अकोल्यातील निंबा फाटा येथे आज दुपरी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बळीराम बघे (वय 50 ) राहणार शेगाव असं मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलवरून RCB आणि पंजाब किंग्स सोशल मीडियावर भिडले
निंबा फाट्याजवळ भरधाव दुचाकी दुचाकी आणि इंडीगो कारमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीचा चुराडा झाला. धडकेमुळे बळीराम बघे दूरपर्यंत फेकले गेले होते. जबर जखमी झाल्यामुळे बळीराम बघे यांनी जागेवर प्राण सोडला.
बळीराम बघे यांच्या अपघाती मृत्यूमुळे घटनास्थळावर गावकऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
त्यानंतर संतप्त झालेल्या मृतकांच्या नातेवाईंकांनी रागाच्या भरात इंडीगो गाडी पेटवून दिली. यात इंडिगो गाडी पूर्णपणे जाळून खाक झाली.
एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह
यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळतचा ऊरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्तिथी नियंत्रणात आणली. परंतु, घटनास्थळावरून इंडिगो कारमधील लोक फरार झाले. पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहे.
मुबंई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रकला अपघात, 2 ठार
दरम्यान, मुबंई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात तीव्र उतारावर खिंडीत ट्रकने डोंगराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.पुण्याहून मुबंईकडे माल घेऊन ट्रक जात होता. बोरघाटातून नो एंट्री मार्गे जात असताना खिंडीजवळील तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे ट्रकने खिंडीच्या डोंगराला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोन जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात तिघे जण अडकले होते. मात्र, एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र, अपघातग्रस्त टीम चे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अडकेल्याना बाहेर काढण्यात मदत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.