Home /News /maharashtra /

महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, 20 दिवसांत घडली दुसरी घटना

महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या, 20 दिवसांत घडली दुसरी घटना

नागपूरातील 22 वर्षीय बॉक्सर प्रणव राऊत यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव जेथे दररोज सराव करायचा त्याच स्टेडियमजवळ त्यानं आपले जीवन संपवले.

    अकोला, 21 फेब्रुवारी : नागपूरातील 22 वर्षीय बॉक्सर प्रणव राऊत यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव जेथे दररोज सराव करायचा त्याच स्टेडियमजवळ त्यानं आपले जीवन संपवले. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास प्रणवने शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथेच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकारामुळं संपूर्ण अकोल्यासह क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. दरम्यान अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. प्रणवनं महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदक जिंकली होती. मात्र त्यानं अचानक उचलेल्या या पावलामुळं त्याच्या प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. प्रणवनं सकाळी नऊच्या सुमारास शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथे गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रीडा प्रमुखांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचेही सांगितले. पोलीस तपास करत असून अद्याप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. याआधी कुस्तीपटूने संपवले होते जीवन 20 दिवसांपूर्वी 'ज्युनियर महाराष्ट्र श्री'चा बहुमान जिंकलेल्या विरारच्या शरीरसौष्ठवपटूने राहत्या घरी आत्महत्या केली होती. अली सलोमानी असे या शरीरसौष्ठवपटूचे नाव असून गेले कित्येक महिने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती होती. शरीरसौष्ठवपटू अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला इमारतीत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून नोकरी नसल्यामुळं अली नैराश्येत होता. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घरात कोणी नसताना अलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अलीच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.अली सलोमनी याने तीन वेळा ‘वसईश्री’ ही स्पर्धा जिंकली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Akola, Nagpur news

    पुढील बातम्या