गावाकडचे गणपती : नवसाला पावणारा गायगावचा गणपती

गावाकडचे गणपती : नवसाला पावणारा गायगावचा गणपती

अकोल्याहून अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असलेल्या या गणपतीप्रती लोकांची मोठी श्रद्धा आहे

  • Share this:

कुंदन जाधव, अकोला, ११ सप्टेंबर - अकोला जिल्ह्यातील मनाली-निमकर्दा येथील गायगावचा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. अकोल्याहून अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातूनच नव्हे, तर अवघ्या विदर्भातून मोठ्या संख्येने भक्तगण याठिकाणी दर्शनासाठी येतात. गणरायाच्या दर्शनासाठी तर अकोला जिल्ह्यातील गणेश भक्त पायदळ वारीसुद्धा काढतात.

शेंदुराची मूर्ती, डोक्यावर चांदीचा मुकुट, मनमोहक अशी श्रींची गायगावच्या मंदिरात आहे. भक्तांची इच्छापूर्ती करणारा म्हणजेच नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्हाला प्रथम रेल्वेने अकोल्याला यावं लागेल. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरूनही तुम्हाला गायगावला पोहोचता येतं. अकोल्याहून अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असलेल्या या गणपतीप्रती लोकांची मोठी श्रद्धा आहे.

हा गणपती स्वयंभू असल्याचेही बोलले जाते. सुमारे १०० वर्षांपूर्वी अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेतात या गणपतीची स्थपना केली. सुरवातीला तीन फुट बाय तीन फुट चौरस आकाराचे देऊळ बांधण्यात आले. शेतशिवारात असल्यामुळे या गणपती मंदिराबाबत भाविकांना जास्त माहिती नव्हती. मात्र हळू-हळू या गणपतीची ख्याती सर्वदूर पसरायला लागली आणि भाविकांची गर्दी श्रद्धा वाढीस लागली. तीस वर्षांपूर्वी मंदिरच्या बाजूने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आणि ख्याती अधिकच पसरली. त्यानंतर याठिकाणी गणपतीचं मोठं मंदिर उभारण्यात आलं. या मंदिरातील बाप्पाची देखरेख पुष्पदेवी अग्रवाल आणि राजेश अग्रवाल करतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती होते. श्रावण महिन्याच्या पहिल्या चतुर्थीला भाविकांची मोठी रिघ याठिकाणी लागते.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या शेगावला श्रीगजानन महाराजांच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने पायी गायगाव मार्गे जातात. शेगाव मार्गावर असलेल्या या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय भाविक पुढच्या यात्रेला जात नाहीत. भाविक दूर गेल्यावरही गणपतीची ओढ त्यांना येथे खेचून आणते. गणेश उत्सवाच्या काळात या मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. हा गणपती नवसाला पावणारा असल्यामुळे अनेक भक्त नवस फेडण्यासाठी या मंदिरात पायी येतात.

 लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

First Published: Sep 12, 2018 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading