कुंदन जाधव, अकोला, 25 मार्च : सरकारी अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक केल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यलयातील अधिकारी असल्याचं सांगत थेट सीमेवर गेलेल्या भामट्याचा पर्दाफाश झाला होता. आता महाराष्ट्रातील अकोल्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोट तालुक्यातल्या दहीहंडा परिसरात एकाला नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी असल्याचं सांगणाऱ्याला अटक करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तरुणाला अधिकारी व्हायचं होतं. मात्र अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरी राहिलं आणि त्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय. अधिकाऱ्याचे चारचाकी वाहन आणि त्यावर फिरत्या पथकाचे स्टिकर लावून तो बिनधास्तपणे फिरत होता. अनेक नागरिकांच्या भेटी घेऊन तो अधिकाऱ्याच्या थाटात तपासणी करत असे. यावेळी अनेक त्रुटी दाखवून दंडात्मक कारवाईची धमकीही द्यायचा.
'तेव्हा' माफी मागितली असती तर आज.., राहुल गांधी प्रकरणात राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
धमकी दिल्यानंतर तो तडजोड करून काही रक्कम उकळायचा. शेवटी हा तोतया अधिकारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. दहीहंडा पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी या भामट्याचे पितळ उघडे पाडले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव नदीम दिवाण असं आहे. अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार इथे तो राहतो.
नदीम हा नार्कोटिक्स विभागाचा तोतया अधिकारी बनून परिसरात फिरत होता. एवढंच नव्हे तर त्याने एका चारचाकी गाडीवर अंबरदिवा लावून दिल्ली येथील नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी म्हणून बोर्डही लावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तोतया अधिकाऱ्याने 3 युवकांना नोकरी लावून देण्याचा आश्वासन देत त्यांना आपल्या सोबत ठेवले होते. दहीहंडा पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्यांला अटक केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे. आता नेमके अजून किती गुन्हे या भामट्याने केले आहेत हे तपासातून समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola