जोरदार धडकेत 'बोलेरो'चा चेंदामेंदा, भीषण अपघातात तृतीयपंथीयासह शिक्षक ठार

जोरदार धडकेत 'बोलेरो'चा चेंदामेंदा, भीषण अपघातात तृतीयपंथीयासह शिक्षक ठार

ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडली.

  • Share this:

कुंदन जाधव, 18 जानेवारी : नागपूरवरुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडली.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातातील मृतांमध्ये एका तृतीयपंथीचा समावेश आहे. ट्रॅक्टर क्रमांक एमएच 30 जे 9623 हा रस्त्यावर उभा असताना वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या टॅक्सी क्रमांक एमएच 49 एफ 0549 या बोलेरो वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये प्रेरणा (35) नामक तृतीयपंथी रा. अकोला ही घटनास्थळी ठार झाली. तर तेल्हारा पंचायत समिती मध्ये जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद सादीक अब्दुल समद(45) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले ऐनुल्ला शेख यांना अकोला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर इरफाना या तृतीयपंथीयावर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 06:13 PM IST

ताज्या बातम्या