6 शार्प शूटरला जे जमलं नाही ते या पठ्ठ्याने केलं, धवलसिंह मोहिते पाटलांनी केला बिबट्याचा खात्मा

नेमबाजीत तरबेज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली होती.

नेमबाजीत तरबेज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली होती.

  • Share this:
अकलूज, 18 डिसेंबर : करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांनी बंदुकीच्या गोळया घालून ठार मारल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्प शूटरची नियुक्ती केली होती. परंतु त्यांनाही गुंगारा देत बिबट्याचा वार सुरूच होता. त्यानंतर अकलूज येथील नेमबाजीत तरबेज असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी नरभक्षक बिबट्याचा खात्मा केला आहे. नरभक्षक बिबट्या मारण्यासाठी वन विभागाच्या शार्प शूटर्सनी फायरींग करूनही नेम चुकल्याने बिबट्या तीन वेळा निसटला होता. करमाळा तालुक्यात वन विभागाचे 200 कर्मचारी तैनात असताना गेली 15 दिवस बिबट्या गुंगारा देत होता. अखेर अकलूजच्या डॉ धवलसिंह मोहिते- पाटील यांनी अवघ्या काही अंतरावरून बिबट्याचा अचूक वेध घेतला असून गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. हेही वाचा - भीषण अपघातात कारचा चक्काचूर, मात्र चमत्काररित्या सर्वजण वाचले मोहिते-पाटील घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे आणि दिवंगत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र डॉ धवलसिंह मोहिते-पाटील हे आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाचा परिसरात दबदबा आहे आणि तो त्यांनी बिबट्याला मारुन परत एकदा सिद्ध केल्याची प्रतिक्रिया या परिसरात उमटत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: