लढत विधानसभेची : अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार?

लढत विधानसभेची : अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने के.सी. पाडवी यांनी उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांना या मतदारसंघात फक्त 279 मतांची आघाडी मिळाली. भाजपच्या हीना गावित यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही.

  • Share this:

नंदुरबार, 17 सप्टेंबर : अक्कलकुवा हा राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. सातपुड्याच्या डोंगरारांगांमध्ये विस्तारलेला हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल आणि मोठा आहे. 1995 पासून काँग्रेसचे के. सी. पाडवी या मतदारसंघाचे आमदार आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने के.सी. पाडवी यांनी उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांना या मतदारसंघात फक्त 279 मतांची आघाडी मिळाली. भाजपच्या हीना गावित यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही.

या मतदारसंघात 95 टक्के मतदार आदिवासी असल्याने हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेसाठी सुटलेला आहे. जिल्हाप्रमुख आणि आक्रमक आदिवासी नेते म्हणून ओळखले जाणारे आमश्या पाडवी याठिकाणी उमेदवारीचे दावेदार मानले जातात. पण भाजपचे काही स्थानिक नेते बंडखोरी करण्याचा तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेना - भाजपने के. सी. पाडवी यांना पराभूत करण्यासाठी आतापर्यंत अनेक राजकीय डावपेच खेळले पण के. सी. पाडवी यांचा आतापर्यंत पराभव झालेला नाही.

महाराष्ट्राचा महासंग्राम : सिंदखेड राजा मतदारसंघात वंचितमुळे समीकरणं बदलणार

अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ दुर्गम असला तरी के. सी. पाडवी यांचा जनसंपर्क दांडगा आहे. या मतदारसंघातल्या राजकारणाचाही त्यांना तगडा अनुभव आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची ताकदही मोठी आहे. या बळावर ते पुन्हा एकदा या निवडणुकीत बाजी मारणार का याची चर्चा इथे रंगली आहे.

2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अक्कलकुवाला डोंगराळ भाग जोडण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघाचं नाव अक्कलकुवा - अक्राणी असं झालं. नंदुरबार जिल्ह्यातला हा सगळ्यात कठीण मतदारसंघ मानला जातो. आता या मतदारसंघावर युती ताबा मिळवणार का ते पाहावं लागेल.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

के .सी.पाडवी (काँग्रेस) - 64 हजार 410

विजयसिंग पराडके (राष्ट्रवादी) 48 हजार 635

नागेश पाडवी (भाजपा) 32 हजार

आमश्या पाडवी (शिवसेना) 10 हजार

========================================================================================

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading