मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : आग्रीपाडा वार्डात मागच्या वेळी गीता गवळींचा विजय, यावेळीही अखिल भारतीय सेनेचे पारडे जड?

BMC Election 2022 : आग्रीपाडा वार्डात मागच्या वेळी गीता गवळींचा विजय, यावेळीही अखिल भारतीय सेनेचे पारडे जड?

वार्ड क्रमांक 212 बद्दल बोलायचे झाले तर येथील आरक्षण बदललेले नाही. यावेळीही हे वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

वार्ड क्रमांक 212 बद्दल बोलायचे झाले तर येथील आरक्षण बदललेले नाही. यावेळीही हे वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

वार्ड क्रमांक 212 बद्दल बोलायचे झाले तर येथील आरक्षण बदललेले नाही. यावेळीही हे वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

 • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. आग्रीपाडा वार्ड क्रमांक 212चा (Agripada Ward No. 212) विचार केला तर अखिल भारतीय सेना (Akhil Bharatiya Sena) पक्षाच्या गीता अजय गवळी या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 212 बद्दल.  2017च्या महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 212मध्ये अखिल भारतीय सेनेच्या गीता अजय गवळी या निवडून आल्या होत्या. त्यावेळी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या वार्डची लोकसंख्या पाहिली तर एकूण लोकसंख्या ही 56278 इतकी होती. यात अनुसूचित जाती 2178 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 141 इतकी होती. तसेच एकूण 21772 मतदार होते. यापैकी 20988 मतदान झाले होते. तसेच नोटाला 290 मतदान मिळाले होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
 1. चौधरी नूरसबा मोहम्मद युसुफ, एएमआयएम - 1918
 2. गिता अजय गवळी, अखिल भारतीय सेना - 9028
 3. सोनम अजय सायगांवकर, शिवसेना - 2148
 4. नाझिया मोहम्मद अशफाक सिद्दीकी, काँग्रेस - 5709
 5. मंदाकिनी मानसिंग खामकर, भाजप - 1124
 6. मोमिन रुक्साना मोहमदसईद, समाजवादी पार्टी - 771
वार्ड क्रमांक 212च्या सीमा -
 1. मोहम्मद शाहिद मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जहांगीर बोमन बेहराम रोड पर्यंत
 2. जहांगीर बोमन बेहराम रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे बेलासिस पुलावरील पश्चिम रेल्वे लाईन्सच्या जंक्शनपर्यंत
 3. पश्चिम रेल्वे मार्गाने उत्तरेकडे केशवराव खाडये मार्गापर्यंत
 4. केशवराव खाडये मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे बापूराव जगताप मार्गापर्यंत
 5. संत घाडगे महाराज चौक येथील केशवराव खाडये मार्ग आणि बापूराव जगताप मार्ग यांच्या जंक्शनपासून सुरू
 6. बापूराव जगताप मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे धावणारी एक ओळ हाफिज अली बहादूर अली खानच्या जंक्शनपर्यंत
 7. हाफिज अली बहादूर खान रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे वॉटर स्ट्रीटच्या जंक्शनपर्यंत
 8. जलमार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे मेघराज सेठी मार्गापर्यंत
 9. मेघराज सेठी मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे अमीर नायक चौकातील मोहम्मद शाहिद मार्ग पर्यंत
हेही वाचा - ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 212 बद्दल बोलायचे झाले तर येथील आरक्षण बदललेले नाही. यावेळीही हे वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे गीता गवळी याठिकाणाहून पुन्हा एका निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या