Home /News /maharashtra /

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता

    उस्मानाबाद, 09 जानेवारी : उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली आहे.  त्यामुळे उद्या संमेलनाला येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता संमेलन उद्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, संमेलनाच्या पूर्वसंध्येला संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती खालावली आहे. आज सकाळपासून दिब्रेटो यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान,  संमेलन उद्यावरून येऊन ठेपले असताना नवा वादाला तोंड फुटले आहे. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धों. महानोर यांना संमेलनाला न जाण्याची धमकी दिली आहे.  ना. धों. महानोर यांना "साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन येत आहेत. वेगवेगळे लोक दररोज फोन करून संमेलनाला न जाण्यासाठी धमकी आणि दबाव टाकत आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असले तरीही आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचं महानोर यांनी स्पष्ट केलं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी फोन करून संमेलनाला जाऊ नका, असं महानोर यांना सांगितले होतं. मात्र, तरीही मी जाणार आहे, असं महानोर यांनी ठामपणे सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या